देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’; माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.भाजपाचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजहितासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.त्याच अनुषंगाने २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बोरिवली-पश्चिम मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’

भारतीय जनता पार्टी बोरिवली-पश्चिम मंडळातर्फे लोकमान्य टिळक जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कस्तुरपार्क बोरिवली पश्चिम येथील प्रार्थना सभागृहात येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उत्तर मुंबईचे लोकसेवक तथा माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर त्यांनी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देऊन शुभेच्छाही दिल्या. यावेळी बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय हेही उपस्थित होते.

माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान 

दरम्यान फक्त याच वर्षी नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली बोरिवली,दहिसर, कांदिवली व मलबार तसेच उत्तर मुंबई परिसरात अनेकदा भव्य रक्तदान शिबिरे पार पडली आहेत.फक्त वाढदिवसच नाही तर, बऱ्याचदा गोपाल शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघात समाजहितासाठी व रक्तदानाची कमतरता भरून काढण्यासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणावर रक्तदान मोहिमा आणि शिबिरांचे आयोजन केले आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी कायमच समाजसेवेचा व मानवकल्याणचा संदेश दिला आहे.

समाजसेवेचा व मानवकल्याणचा संदेश 

तसेच या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत या संदेशाच पालन केलं आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सेवामय उपक्रमांनी साजरा करत ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्पाने’ राबवण्यात आला.उत्तर मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक