जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’

नीट पेपर लीकमुळे देशभरातली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. या हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर पसरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नीट पेपर लीकच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी एकवटले आहेत. राजकीय मंडळी, काही सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच आता सचिन तेंडुलकरे एक्सवर एक खास पोस्ट शेअर करत याबाबत त्याचं मत मांडलं आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरचे ट्वीट

सचिनने ट्वीट करत म्हटलंय, “विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, तिथे मेरिटचा विजय होवो”. पुढे तो म्हणाला की, “माझे वडील देखील एक प्रोफेसर होते.ते अनेक तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक आणि सल्लादार होते.त्यांनी मला सुरुवातीपासूनच एक गोष्ट शिकवली होती, अपयश ठीक आहे, पण चीटिंग करणं नाही. कधीही शॉर्टकट स्वीकारू नको. समाजात मोठं असल्याने आपली जबाबदारी आहे की, संस्कृतीला योग्य दिशा द्या.जो समाज मेहनती शिवाय निकालांना जास्त महत्व देतो, तो क्षमेतेपेक्षा शॉर्टकटला निवडतो”.

‘जेव्हा विद्यार्थी नैराश्यात आहेत….’

सचिनने पुढे म्हटलं, “आज, जेव्हा विद्यार्थी नैराश्यात आहेत, कारण त्यांच्या कठोर मेहनतीचा त्यांना फळ मिळालं नाही, तर त्यांची नाराजी समजली जाऊ शकते. आपण सर्वांनी मिळून हे निश्चित केलं पाहिजे की,त्यांच्यापुढे पुन्हा अशी स्थिती निर्माण न होवो. तरुण भारत स्वप्न आणि उर्जेने भरलेला आहे. तो आमच्या यशाचा आधार आहे.”

सचिन तेंडुलकरने मांडली रोख-ठोक भूमिका 

एवढंच नाही तर तो पुढे म्हणाला की, “एक समाज म्हणून, आई-वडील, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि एडमिनिस्ट्रेटर आपल्या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. वेगवेगळ्या भूमिका आहेत. जेणेकरून आपले तरुण नेहमीच उत्साहित आणि उर्जावान राहतील. आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल, जिथे कठोर मेहनतीला प्राधान्य दिलं जाईल. प्रामाणिकपणाला महत्त्व मिळेल आणि क्षमतेचा विजय होईल. मला विश्वास आहे की, आपण सर्व मिळून असा पर्याय काढू,जो आपल्या मुलांच्या भविष्याला मजबूत करेल आणि त्यांच्या अपेक्षांना सुरक्षीत ठेवेल. जय हिंद”. अशी भूमिका मांडत त्याने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचं आवाहन करत त्यांच्या या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दर्शवला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर ‘त्या’ व्हिडीओची दखल; महिला आंदोलकाला कानशि‍लात मारणं महागात; पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्यावरून थेट उचलबांगडी

    नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिला आंदोलकाच्या कानशि‍लात लगावली होती. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आली…

    जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

    NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, थेट सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी संविधानाची प्रस्तावना…

    Leave a Reply

    You Missed

    जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’

    जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’

    अखेर ‘त्या’ व्हिडीओची दखल; महिला आंदोलकाला कानशि‍लात मारणं महागात; पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्यावरून थेट उचलबांगडी

    अखेर ‘त्या’ व्हिडीओची दखल; महिला आंदोलकाला कानशि‍लात मारणं महागात; पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्यावरून थेट उचलबांगडी

    जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

    जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

    विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

    विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

    मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

    मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

    मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

    मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

    25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

    25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

    राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

    राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

    महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

    महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा