सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे; पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, नक्की काय घडलं?

नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातील युवा वर्ग आक्रमक झाला असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहेत. हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर पसरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पण याबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं

सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं आहे. २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा अनेक घडामोडी घडल्या आहेत.सरकारने पेपरफुटीशी संबंधित प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली आहे. तसेच शिक्षण सचिवांची बदलीही करण्यात आली होती. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कठोर कारवाईचे आश्वासन देणारा व्हिडिओ संदेशही जारी केला.

गुरुवारी मध्यरात्री काय घडामोडी घडल्या?

केंद्र सरकारने शिक्षण सचिव विनीत जोशी यांची शिक्षण मंत्रालयातून बदली करण्यात आली आहे.नरेश पाल गंगवार यांची शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. विनीत जोशी यांची आता पंचायत राज मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

एवढंच नाही पेपरफुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांची सुनावणी करण्यासाठी जलदगती न्यायालयाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात जलदगती न्यायालय स्थापन केले जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने तीस हजार न्यायालयातील मध्यस्थी केंद्राच्या प्रभारी न्यायाधीश, न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा यांची राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात विशेष न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. त्या पेपरफुटीशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ जारी

दरम्यान सकाळी ११:५२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ जारी केला. त्यांनी पेपरफुटीसारख्या घटनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, ‘जे तरुणांचे भविष्य धोक्यात घालतील त्यांना सोडणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. शुक्रवारी मंत्रिमंडळात पेपरफुटीविरोधात अधिक कठोर निर्णय घेतला जाईल’,असं आश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याची बातमी समोर आली. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह त्यांचे उपोषण सोडण्यासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल झाले. वांगचुक २६ दिवसांपासून उपोषणावर होते. उपोषण सोडल्यानंतर त्यांनी सांगितले की देशातील संभाव्य हिंसाचाराचा विचार करून त्यांनी उपोषण सोडले आहे.

शुक्रवार हा दिवसही खूप घडामोडींचा

शुक्रवार हा दिवसही खूप घडामोडींचा असणार आहे. कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीने एक पोस्टर प्रसिद्ध करून लोकांना सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये शांततेने एकत्र येऊन शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्याचे आवाहन या आंदोलनात करण्यात आले आहे.

पेपरफुटीबाबत कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता

या आंदोलनासाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनेही सकाळी ७:३० पासून १६ मेट्रो स्टेशन्स बंद केली आहेत. याव्यतिरिक्त, शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे कारण यात पेपरफुटीबाबत कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की,फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या विधेयकाच्या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा केली जाणार आहे.हे विधेयक सभागृहात लवकरात लवकर मंजूर केले जाईल, असेही मोदींनी सांगितलं आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक