मालाड-मढमधील धडपड्या तरुणाची मोठी झेप;आदित्य ठाकरे यांच्याकडून आदित्य सुतार यांच्यावर नवी जबाबदारी

सामाजिक,शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे युवा कार्यकर्ते आदित्य संजय सुतार यांच्या कार्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य सुतार यांची मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या विभाग युवा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कायम सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग

आदित्य सुतार यांनी मढ परिसरातील सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत युवकांना संघटित करण्याचे काम केले आहे. मढ आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर राबवण्यात आलेल्या बीच स्वच्छता मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत तरुणांना स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

शैक्षणिक क्षेत्रातही आदित्य सुतार यांचे उल्लेखनीय कार्य

शैक्षणिक क्षेत्रातही आदित्य सुतार यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, अशा विविध उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा,प्रवास, प्रवेशप्रक्रिया तसेच इतर अडचणींचा सामना करावा लागल्यास त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांच्या समस्या, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.

युवा अधिकारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी

त्यांच्या या सामाजिक आणि संघटनात्मक कामाची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य सुतार यांच्यावर विभाग युवा अधिकारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मालाड पश्चिम विधानसभा आणि मढ परिसरातील युवासेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

नियुक्तीनंतर आदित्य सुतार यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवासैनिक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडून शिक्षण, रोजगार, पर्यावरण आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी काम करण्याचा संकल्प आदित्य सुतार यांनी व्यक्त केला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक