सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वांचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असून मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील सर्वच गणेश मंडळं कामाला लागली आहेत. पुणे आणि मुंबईचा गणोशोत्सव तर देशभरात चर्चेचा विषय असतो. दरम्यान, गणेशोत्सवासोतबच इतरही सण येत असल्यानं याच पार्श्वभूमीवर डीजेबंदी, लाऊडस्पीकरवरील बंदीची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात लाऊडस्पीकर तसेच डीजे, ढोल-ताशांवरील बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच आता नागपूरमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.

१ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज म्हणजे ३ सप्टेंबर रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण तसेच लेझर लाईटमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

पोलिसांकडून नियमानुसार कारवाई

बंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करून उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनीप्रदूषणापासून मोठा दिलासा

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. सामान्य नागरिकांना आणि रुग्णांना ध्वनीप्रदूषणापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन

डीजेऐवजी ढोल-ताशे, बँड, संदल आणि भजन यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे…

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं…

    Leave a Reply

    You Missed

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन