पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.एवढंच नाही तर लातूर शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्या केवळ साडेतेरा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी आग्रही मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा

या पार्श्वभूमीवर धीरज देशमुख यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. धीरज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे या व्हिडीओद्वारे महाराष्ट्रातील अत्यल्प पाऊस झालेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याची विनंती केली आहे.ते म्हणाले की, “अनेक भागांमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची उदाहरणं समोर आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा बिकट काळात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. ”

संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं महत्त्वाचं

पुढे ते म्हणाले, “पावसाळ्याच्या उर्वरित दिवसांत ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्या भागांत हा प्रयोग राबवून शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येऊ शकतं. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबाबत निश्चित नसलं तरी, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतंय, हा विश्वास देणं अत्यावश्यक आहे.” असं धीरज देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. शेतकरी संकटात असल्याने उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरण्याची हीच वेळ आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार ठामपणे उभे आहे, हे कृतीतून दाखवण्याची गरज आहे, असेही धीरज देशमुख यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीनं सरकारला साकडे 

पावसाची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीनं आपण सरकारला साकडे घालत असल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं कृत्रिम पावसाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, असं आवाहन देखील धीरज देशमुख यांनी सरकारला केलंय.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू