मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनोरी-गोराई समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला आणि उभारणीला स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बोरीवली येथील आर-मध्य विभागात उप प्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालमते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत उपस्थित नागरिकांनी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याची आक्रमक मागणी केली.

कायदेशीर प्रक्रिया आणि पर्यावरणाचा मुद्दा

बैठकीच्या सुरुवातीला ॲड.गॉडफ्रे पिमेंटो यांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, पालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सादर केलेले अहवाल आणि मिळालेली नाहरकत प्रमाणपत्रे त्रुटीपूर्ण असून त्याची कायदेशीर अंमलबजावणी करता येणार नाही.

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वीट सी यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्पष्ट केले की, तब्बल ४,००० कोटी रुपये अशा प्रकल्पांवर खर्च करण्यापेक्षा पालिकेने शहरातील २५% पाण्याची गळती रोखण्यावर लक्ष केंद्रित केले तर लाखो लिटर पाणी वाचेल. तसेच, वाळवंटी देशांची उदाहरणे देऊन मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरात असा प्रकल्प लादणे चुकीचे आहे.

मच्छिमारांच्या रोजगारावर संक्रांत

महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी FSI च्या अहवालाचा हवाला देत प्रशासनाचा चुकीचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, “भारतीय सागरी मत्स्य पाहणीनुसार निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सुमारे ८३% माशांचे उत्पादन किनारपट्टीपासून १०० किमीच्या परिसरातच मिळते. सन २०२४-२५ मध्ये सागरी मासेमारीतून ७३,९८०.४६ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. बीएमसीच्या या प्रकल्पामुळे दररोज ६० एमएलडी वाढीव अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाईल, ज्यामुळे सागरी जैवविविधता, माशांची प्रजनन क्षेत्रे आणि लहान मच्छिमारांचा उदरनिर्वाह पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

जगन्नाथ कोळी यांनी संताप व्यक्त करत

या प्रकल्पामुळे वसई, उत्तन, गोराई, मनोरी, मालवणी, मार्वे, भाटी, मढ, वेसावे, जुहू, खारदांडा ते कुलाबा या संपूर्ण किनारपट्टीवरील लहान-मोठे मच्छिमार, बर्फ उत्पादक, डिझेल पुरवठादार आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. मढ मच्छिमार सर्वोदयचे अध्यक्ष जगन्नाथ कोळी यांनी संताप व्यक्त करत, “सरकार कोळीवाड्यात प्रकल्प आणून कोळी समाजाला किनारपट्टीवरून हकलण्याचे षडयंत्र रचत आहे का?” असा सवाल केला.

बैठकीचा निकाल आणि पुढील इशारा

उप उपप्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालमते यांनी मच्छिमारांचा रोष पाहून “वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय कळवतो” असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी सादरीकरण पाहण्यास नकार देत प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. अधिकारी कोणताही ठोस निर्णय न घेता केवळ निवेदन स्वीकारून निघून गेल्याचं सांगितलं जातं आहे.

कोळीवाड्यातील भूमिपुत्र महिला व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या बैठकीत MMKS चे सरचिटणीस किरण कोळी, ॲड. गॉडफ्रे पिमेंटो, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, हेमंत कोळी, ऑल्डीन वसईकर, रॉनी केणी, रमाकांत पाटील, सायमन गारोडी, राजीव कोळी, जगन्नाथ कोळी, धीरज भंडारी, प्रमोद पाटील, दीपक वासावे, नारायण कोळी, जॉन्सन भाटकर, विल्यम जॉर्ज, सिस्टर क्रिस्टल, प्रिन्सिली, गोविंदा कोळी आणि नेव्हिल डिसोझा यांच्यासह कोळीवाड्यातील भूमिपुत्र महिला व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प न थांबवल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि प्रसंगी कायदा हातात घेण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच