तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी खाद्यतेल विक्रीबाबत आपली कारवाई केली होती. खाद्यतेलातील भेसळ आणि गुणवत्तापूर्ण दर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांनी सुटे खाद्यतेल विक्रीला राज्यात बंदी घातली होती. मात्र,आता या निर्णयानंतर तेली समाजाने पारंपरिक व्यवसाय असल्याचे सांगत या निर्णयास विरोध केला होता.

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेत सुटे खाद्यतेल विक्रीला बंदी घातली होती. मात्र, या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आणि पारंपरिक पद्धतीने खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात आला होता.तसेच सुटे तेल विक्री करणारे बहुसंख्य गरीब ग्राहक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मोठा निर्णय, एका वर्षाची मुदत 

त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खाद्य तेल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायासमोरील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.चर्चा झाल्यानंतर तुकाराम मुंढेंच्या खाद्य तेल विक्रीसंदर्भातील निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. सुट्टे खाद्यतेल विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. राज्य सरकारने सुट्टे खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आणखी एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला तूर्तास मुदतवाढीच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे.

‘एका वर्षात व्यवसायात आवश्यक बदल करा’

मात्र, ही मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना या एका वर्षाच्या कालावधीत आपल्या व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले आहे. कायद्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले की, २०११ मध्ये हा कायदा करण्यात आला असून खाद्यपदार्थांची गुणवत्ता हा त्यामागील महत्त्वाचा निकष आहे. मात्र, आजही अनेक गरीब आणि सर्वसामान्य नागरिक सुट्टे तेल खरेदी करतात. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना सामान्य नागरिक आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

FDA आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती

पारंपरिक पद्धतीने खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना काय बदल करावे लागतील, यासाठी FDA आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडूनही मदत केली जाईल. त्यामुळे सध्या सुट्टे खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, या कालावधीत नियमांनुसार व्यवसाय पद्धतीत बदल करणे त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू