महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं आणि भव्य उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.

११ महिन्यांच्या बाळाला गंभीर आजार, १० कोटींचे इंजेक्शन

हृदय दरेकर या ११ महिन्यांच्या बाळ ‘SMA Type1’ म्हणजे ‘स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी’. या आजारामध्ये शरीरातील सर्व स्नायू हळूहळू काम करणे बंद करतात. बाळाला श्वास घेणे आणि गिळणेही कठीण होऊन बसते. यावर उपचार म्हणून अमेरिकेतून एक विशेष जनुक थेरपी इंजेक्शन मागवावे लागणार होते. मात्र, या उपचाराचा खर्च तब्बल १० कोटी रुपयांच्या घरात होता. एका सामान्य कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे केवळ अशक्य होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन

बाळाची बिकट परिस्थिती पाहून मदत करण्यासाठी पुढे आले ‘गरड खानावळी’चे मालक. त्यांनी स्वतः दरेकर कुटुंबाला आर्थिक मदत केलीच, शिवाय एक अत्यंत भावूक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. गरड खानावळीच्या मालकांनी तसा व्हिडीओ बनवून सोशल मिडियाच्या माध्यामातून त्या बाळाच्या उपचारासाठी म्हणजेच त्या इंजेक्शसाठी पैशांच्या मदतीचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला जशी जमेल, तेवढी तशी आणि त्याप्रमाणे मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी स्वत: दरेकर कुटुंबाला मदत केली आहे.

गरड व्हिडीओच्या माध्यमातून म्हाणाले होते, “१० कोटी रुपयांचं इंजेक्शन.एका लहानग्या जीवाला वाचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.आपण दिलेला प्रत्येक छोटा-मोठा हातभार या बाळासाठी नवीन आयुष्य देऊ शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी सढळ हाताने मदत करा, आणि ज्यांना शक्य नाही, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य वेळी मदत पोहोचू शकेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला काही कमी पडणार नाही” असं म्हणत त्यांनी विनंती केली होती.

संवेदनशील महाराष्ट्र, तब्बल ४ दिवसांत १० कोटी जमा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्राने ज्या वेगाने प्रतिसाद दिला, तो मन हेलावून टाकणारा होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार अशा सर्वांनीच सढळ हाताने मदत केली आणि चमत्कार घडला. अवघ्या ४ दिवसांच्या आत १० कोटी रुपयांचा भलामोठा निधी पूर्ण झाला. ही केवळ पैशांची मदत नव्हती, तर महाराष्ट्रातील संवेदनशील आणि दानशूर लोकांच्या एकतेची मोठी ताकद होती.छोट्या-छोट्या मदतीतून उभा राहिलेला हा मोठा आधार आज एका जीवासाठी आशेचा किरण ठरला आहे.

खरंच,आपल्या महाराष्ट्रातील लोक किती दयाळू आणि दानशूर आहेत, याचं हे एक सुंदर उदाहरण आणि आदर्श सर्वांसमोर उभा राहिला आहे. हृदयच्या कुटुंबाने सर्व महाराष्ट्राचे , मदत करणाऱ्या हातांचे मनापासून आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by BEED 📍 (@beed.leader)

सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका

दरम्यान या व्हिडीओनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवरही टीका केली आहे. सोशल मीडियावर नागरिकांमधून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अशा दुर्मिळ आणि प्राणघातक आजारांसाठी सामान्य कुटुंबांना दरवेळी सोशल मीडिया किंवा क्राउडफंडिंगवरच अवलंबून राहावे लागणार का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.केंद्र आणि राज्य सरकारने अशा आजारांच्या उपचारासाठी, इंजेक्शनवरील करमाफीसाठी आणि रुग्णांना वेळेत आर्थिक मदत देण्यासाठी ठोस धोरण व विशेष वैद्यकीय निधीची तरतूद करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू