महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला गेला आहे.

देशभरातील ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशभरातील ८२ शिक्षकांची निवड, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा डंका

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील ८२ शिक्षकांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. यात महाराष्ट्रातील बीड, लातुर, नाशिक व साताऱ्यातील ४ शिक्षकांचा समावेश आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना कोडिंग शिकवण्यापासून ते महापालिका शाळेतील मुलांना थेट अमेरिकेशी जोडण्यापर्यंतचे हे प्रयोग शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरले आहेत.

बीडमधील डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे

यात बीडमधील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे यांनी दिव्यांग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन करीत त्यांनी शैक्षणिक गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. गेल्या २९ वर्षांपासून ते हे कार्य करत आहेत.

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८ मधील कुंदा जयवंत बच्छाव

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८ मधील कुंदा जयवंत बच्छाव यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले. ‘मिशन मोबाईल-फ्री’अंतर्गत ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा, यांसारख्या उपक्रमांसोबत अमेरिकेतील शाळांशी ई-ट्विनिंगद्वारे संवाद साधून विद्यार्थ्यांना डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय अनुभव दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन दृष्टिकोन विकसित झाला. लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील वैभव वसंतराव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला.

लातुरातील गणिताचे जादुगार शिक्षक वैभव कुलकर्णी

जवाहर नवोदय विद्यालयातील या शिक्षकाने क्रीडा आणि खेळण्यांच्या माध्यमातून गणिताची भीती दूर केली. डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत त्यांनी ‘मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी’ या आपल्या यूट्यूब वाहिनीवरून ७०० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली. तसेच कमी खर्चातील अध्यापन साहित्याद्वारे ८०० शिक्षकांना प्रशिक्षित करून शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा राखली.

साताऱ्याचे प्रयोगशील शिक्षक शिवप्रसाद टिंगरे

सैनिक शाळेमध्ये विज्ञान विषयासाठी शून्य खर्चात अध्ययन सुलभ पुनरावर्तन प्रारूप विकसित केले. विद्यार्थ्यांनी नुसत्या कल्पना न मांडता प्रत्यक्ष प्रोटोटाइप बनवावेत यासाठी त्यांनी प्रेरित केले. यातूनच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या न्यूट्रिस्टोव्हला थेट पेटंट मिळाले आहे.

 भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे डॉ. विक्रम विशाल 

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या भूविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे संगणकीय आणि प्रायोगिक भूयांत्रिकी संशोधन गटाचे नेतृत्व करतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कार्बन पकड व साठवणूक तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणालींवर त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.

वर्धाचे डॉ. अमर मोहनराव ताकसांडे 

बालरोग विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. अमर ताकसांडे यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासोबतच ग्रामीण भागातील बालकांना सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूरचे डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे 

इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार क्षेत्रातील प्रतिमा प्रक्रिया आणि जैवमिती या विषयांमध्ये डॉ. संदीपान नरोटे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि बदलत्या औद्योगिक गरजांनुसार त्यांची क्षमता विकसित व्हावी यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिवचे किरण प्रकाश झारकर 

पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत श्री. किरण झारकर यांनी धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रभावी शिक्षण परिसंस्था विकसित केली. डिजिटल माध्यमे, संगणकाधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह रोजगारक्षमतेलाही मोठी चालना मिळाली आहे.

अर्चना राकेश जाधव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

आदिवासी आणि दुर्गम भागातील युवतींना कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी श्रीमती अर्चना जाधव यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. वस्त्र व फॅशन रचना तंत्रज्ञान विभागात प्रशिक्षण देताना त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी युवतींना आधुनिक वस्त्ररचना, शिवणकाम आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्यांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले. या माध्यमातून अनेक युवतींना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन टप्पे पार पाडण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ दरम्यान पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्वनामांकन स्वीकारण्यात आले.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे बीपीसी मुख्यालयातील टपाल कर्मचाऱ्यांवर काहींनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींवर तात्काळ…

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात…

    Leave a Reply

    You Missed

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण