पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

दक्षिण दिल्लीतील सत्यनिकेतन भागात मुलांचे वसतिगृह असलेली ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर १०जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अद्याप ३० हून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती व्‍यक्‍त होत असून, बचावकार्य वेगात सुरू आहे.

दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. अरुंद गल्लीत असलेली सुमारे 30 वर्षे जुनी आणि जीर्ण पाच मजली इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीत मुलांसाठी पेइंग गेस्ट सुरू होते. दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, काही क्षणांतच संपूर्ण इमारत कोसळल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुर्घटनेची भीषणता जाणवते. दुर्घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक पालक आपल्या मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. राजधानी दिल्लीतच अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इमारत मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी साऊथ कॅम्पस पोलीस ठाण्यात इमारत मालक हरिराम याच्यासह इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, इमारतीच्या देखभालीत निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम होऊन ती कोसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत.

बचावकार्यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग

इमारत कोसळल्यानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. ठिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असताना स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनीही बचावकार्यात मदत केली. उपलब्ध साधनांचा वापर करत त्यांनी ठिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

NDRFच्या दोन पथकांसह सुमारे 70 जवान, डॉग स्क्वॉड आणि इतर बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. दिल्ली पोलीस, दिल्ली अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), दिल्ली महापालिका, कॅट आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांकडूनही मदतकार्य सुरू होते

ठिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजन सिलिंडर

ठिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडचण येऊ नये यासाठी बचाव पथकांनी ऑक्सिजन सिलिंडर आत पोहोचवले. जीवित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉडचीही मदत घेण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे राहतात

सत्य निकेतन परिसरात देशाच्या विविध भागांतून दिल्ली विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे राहतात. मात्र, परिसरातील अनेक इमारतींच्या बांधकामास तसेच त्यांचा PG म्हणून वापर करण्यास आवश्यक परवानग्या आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून जास्त भाडे घेतले जाते; मात्र त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाते का, हा गंभीर मुद्दा या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    उत्तर प्रदेशात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ते, गटारे आणि सोलर लाईट्स बसवण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांनी तब्बल ३५…

    Leave a Reply

    You Missed

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी