वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

मुंबई पश्चिम उपनगरात वर्सोवा व मढ यादरम्यान सुमारे दोन हजार ३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित ‘केबल-स्टेड’ पुलासाठी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी हिरवा कंदील दाखवला. पर्यावरण आणि विकास या दोन्ही गरजांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने ही मंजुरी देताना नमूद केले. या नवीन पुलामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ यात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, या फायद्यांचा विचार पर्यावरणाशी संबंधित चिंतांच्या तुलनेत करणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने अधोरेखीत केले.

दीड तासाचा प्रवास पाच मिनिटांत

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचे अंतर सुमारे १८ ते २० किलोमीटरने कमी होईल. सुमारे दीड तासाचा प्रवास केवळ पाच मिनिटांत पूर्ण होणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ७० ते ८० मिनिटांची बचत होईल. हा पूल झाल्यानंतर न्यू लिंक रोड,पश्चिम द्रुतगती महामार्ग व एस. व्ही. रोडवरील अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल’, असा दावाही महापालिकेने न्यायालयात केला.

या प्रकल्पासाठी पर्यावरण कायद्याप्रमाणे विविध प्रशासनांनी दिलेल्या मंजुरींमधील अटींचे पालन करून या प्रकल्पात अडथळा ठरणारी एक हजार २३७ खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी व न्या.अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली.

प्रवासासाठी बराच वेळ लागतो.

‘सध्याच्या परिस्थितीत वर्सोवा ते मढ असा रस्त्याने प्रवास करायचा असल्यास नागरिकांना अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, ओशिवरा आणि त्यानंतर मालाडमार्गे मढ-मार्वे रस्त्याने जावे लागते. मढ-मार्वे रस्ता हा कांदिवली लिंक रोड किंवा मालाड लिंक रोडपासूनच १२ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. हा प्रवास मोठा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासासाठी बराच वेळ लागतो.

फेरीबोटीचा पर्यायी मार्ग उपलब्ध

वर्सोवा जेट्टी ते मढदरम्यान एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी फेरीबोटीचा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. सकाळी ५ ते रात्री १ वाजेपर्यंत या मार्गावर तीन फेरीबोटी कार्यरत असतात. मात्र, ओहोटीच्या काळात फेरीसेवा बंद ठेवावी लागते. शिवाय या फेरीसेवेच्या काही मर्यादाही आहेत. अशा परिस्थितीत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे’, असे महापालिकेने ॲड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत केलेल्या रिट याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले होत.

वाहतूक वळवण्यास मदत

सध्याचा प्रकल्प हा मालाड खाडीवरून मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडण्यासाठी २,०६४ मीटर लांबीचा चार मार्गिकांचा केबल-स्टेडपूल उभारण्याचा आहे. हा पूल २७.४५ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्याशी आणि कोस्टल रोडच्या मार्गाशी जोडला जाणार आहे. नव्याने विकसित करण्यात येणारे डीपी रस्ते आणि प्रस्तावित पूल यामुळे एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक वळवण्यास मदत होणार आहे’, असेही ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

महापालिकेची हमी

प्रकल्पाला पर्यावरणविषयक प्रशासनांच्या आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत.किनारी नियमन क्षेत्र अधिसूचनेनुसार, उत्तर कोकण खारफुटी विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील नऊ हेक्टर खराब झालेल्या खारफुटी वनक्षेत्रात ३९ हजार खारफुटीची पर्यायी झाडे लावण्यात येतील’, अशी हमी महापालिकेतर्फे देण्यात आली. तसेच या झाडांची १० वर्षे देखभाल व अन्य कामांसाठी एक कोटी ४२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत’, असेही महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरुच आहे.आता FDA नं थेट जुहू येथील प्रसिद्ध इस्कॉनच्या तीन आस्थापनांवर धाड टाकली असता तेथील अवस्था पाहून त्यांचे परवाने थेट…

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई-गोवा महामार्गावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे नागोठाणे उड्डाणपुलाबाबतचा. या पूलाला भेगा पडल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.याच नागोठाणे उड्डाणपुलाबाबत एक…

    Leave a Reply

    You Missed

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर,  १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल