UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

१५ ऑक्टोबरपासून २००० पेक्षा जास्त रकमेच्या निवडक UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR लागू होणार आहे. मात्र, हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांनाच म्हणजेच मर्चंट्सनाच भरावे लागणार आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये MDR चा दर ०.४% ठेवण्यात आला आहे, ज्याची कमाल मर्यादा प्रति व्यवहार ३००रुपये निश्चित करण्यात आली आहे. काही विशेष क्षेत्रांसाठी हे शुल्क प्रति व्यवहार निश्चित ५ रुपये असेल, तर कॅपिटल मार्केट व्यवहारांसाठी ते ०.०२% राहील.

कोणाला UPI द्वारे पेमेंट केल्यावर शुल्क द्यावे लागणार?

सामान्य ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट केल्यावर शुल्क द्यावे लागणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याबाबत ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीये. सर्वसामान्य लोकांमध्ये होणारे पर्सन-टू-पर्सन (P2P) पेमेंट्स पूर्वीप्रमाणे पूर्णपणे मोफत राहतील. याशिवाय, कोणत्याही दुकानात किंवा व्यापाऱ्याला २००० रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केल्यावरही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार, सुमारे ९६% पर्सन-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

कोणत्या पेमेंटवर GST लागणार?

तसेच UPI पेमेंटच्या रकमेवर १८ % GST लागणार नाहीये तर केवळ MDR म्हणून आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्कावर लागू होईल. म्हणजे एखाद्या ग्राहकाने व्यापाऱ्याला १०,००० चे पेमेंट केले आणि त्यावर ०.४% म्हणजेच ४० MDR आकारला गेला, तर १८% GST केवळ या ४० रुपयांवरच आकारला जाईल जो अगदीच परवडणारा असतो. अशा प्रकारे, व्यापाऱ्याला एकूण फक्त ४७.२० रुपये प्रक्रिया शुल्क द्यावं लागेल.

किती GST द्यावा लागेल ?

तर अशा पद्धतीने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, फक्त निवडक व्यापाऱ्यांना विशिष्ट व्यवहारांवर लागणाऱ्या MDR शुल्कावर १८% GST द्यावा लागेल. हा GST संपूर्ण व्यवहाराच्या रकमेवर नाही, तर फक्त प्रोसेसिंग फीवरच लागू होणार आहे हे स्पष्ट होतं.

या नियमानुसार कोणाला GST किंवा शुल्क द्यावे लागेल आणि कोणाला पूर्ण सूट मिळेल,याबाबत जाणून घेऊयात.

कोणाला पूर्ण सूट मिळेल? (GST किंवा शुल्क शून्य)

सर्वसामान्य ग्राहक: तुम्ही मित्र, कुटुंबियांना पैसे पाठवत असाल (P2P) किंवा दुकानात जाऊन खरेदी करत असाल, तर तुम्हाला कोणताही GST किंवा अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही

२,००० रुपयांपर्यंतचे मर्चंट पेमेंट्स: दुकानात किंवा ऑनलाइन व्यापाऱ्याला २,००० किंवा त्यापेक्षा कमी रकमेचे UPI पेमेंट केल्यास त्यावर मर्चंटलाही कोणतेही शुल्क किंवा GST लागत नाही

छोटे व्यापारी: ज्या छोट्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाखांपेक्षा कमी आणि सेवा पुरवठादारांसाठी २० लाखांपेक्षा कमी आहे, ते या शुल्कातून आणि GST च्या कक्षेतून बाहेर राहतील.

तर, कोणाला GST द्यावा लागेल? फक्त व्यापाऱ्यांसाठी

मोठे व्यापारी आणि व्यावसायिक: जेव्हा एखादा ग्राहक व्यापाऱ्याला २,००० पेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट करतो, तेव्हा त्या मोठ्या मर्चंटवर ०.४% पर्यंत MDR म्हणजे सेवा शुल्क लागू होईल. या सेवा शुल्कावर १८% GST आकारला जाईल.

महत्त्वाचं म्हणजे जे व्यापारी GST अंतर्गत नोंदणीकृत आहेत, ते MDR वर भरलेल्या या १८% GST चा इनपुट टॅक्स क्रेडिट अंतर्गत परतावा म्हणजे क्लेम मिळवू शकतात, ज्यामुळे त्यांच्यावरील कराचा निव्वळ भार कमी होईल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईत दर रविवारी उपगनरीय रेल्वे मार्गावर काही तासांसाठी ब्लॉक घेतला जातो. रुळ, सिग्नल दुरुस्ती तसच अन्य कामांसाठी हा ब्लॉक असतो. ब्लॉकच्या काळात काही नियमित धावणाऱ्या लोकल रद्द केल्या जातात किंवा…

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोली बसस्थानकातून चामोर्शी जाण्यासाठी निघालेल्या बसचा शिवनी येथील नवीन पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.बसची स्टेअरिंग जाम झाल्याने बस पलटी झाल्याचं बोललं जात आहे. गडचिरोली डेपोतून एमएच-०६-८८४८ क्रमांकाची…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना