गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

गडचिरोली बसस्थानकातून चामोर्शी जाण्यासाठी निघालेल्या बसचा शिवनी येथील नवीन पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.बसची स्टेअरिंग जाम झाल्याने बस पलटी झाल्याचं बोललं जात आहे. गडचिरोली डेपोतून एमएच-०६-८८४८ क्रमांकाची बस चामोर्शी मार्गाने जात असताना शिवनी येथील नवीन पुलाजवळ बस पलटी झाली.

अपघातात ३८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती

या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून,यातील ८ प्रवासी गंभीर तर ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने १० अॅम्बुलन्स, चार पोलिस वाहने पोहोचून सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याप्रकरणी गडचिरोली पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातस्थळी व जिल्हा सामान्य रूग्णालयात अप्पर पोलिस अधीक्षक गोकुळराज, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी भेट देऊन जखमींचे विचारपूस केली. या घटनेची पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

सहपालकमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली

बस अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची माहिती सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्याकडून घेतली. जखमींवर योग्य उपचार करून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सुपे घाटातही झाला होता अपघात

बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला बुधवारी दिनांक १६ सकाळी अपघात झाला. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस घाटातील पहिल्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईत दर रविवारी उपगनरीय रेल्वे मार्गावर काही तासांसाठी ब्लॉक घेतला जातो. रुळ, सिग्नल दुरुस्ती तसच अन्य कामांसाठी हा ब्लॉक असतो. ब्लॉकच्या काळात काही नियमित धावणाऱ्या लोकल रद्द केल्या जातात किंवा…

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    १५ ऑक्टोबरपासून २००० पेक्षा जास्त रकमेच्या निवडक UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR लागू होणार आहे. मात्र, हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांनाच म्हणजेच मर्चंट्सनाच भरावे लागणार आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये MDR…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना