“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील एका पोलीस अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ५७ वर्षे पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे असं त्यांचं नाव असून ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं अन् क्षणात सगळं संपलं.

छातीत दुखायला लागलं अन् चक्कर आली

PSI विजय सांगडे यांच्या निधनामुळे सध्या दु:खाचे वातावरण आहे. ५७ वर्षे पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे नेहमी प्रमाणे ड्युटीवर आले पण तो दिवस त्यांचा शेवटचा दिवस ठरला. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ते ड्युटीवर आले. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याच्या पुढच्या क्षणीच पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांना मृत घोषित केलं. गेल्यातीन वर्षांपासून सांगडे हे एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकात होते.

पोलीस दलातही हळहळ व्यक्त

सांगडे यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचं डोंगर कोसळलंय. तर सांगडे यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील पोलीस दलातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टराने सांगितलं की, सांगडे यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगडे यांच्या निधनानंतर ठाण्यातील सिव्हील रुग्णालय परिसरातच पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली गेली.

ड्युटीवर जाताना म्हणाले दरवाजा आतून लावून घ्या, मी येतो…

पोलिसांनी सांगितलं की, सांगडे हे डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये निवासी आहेत. तर कुटुबांनी माहिती दिली की, त्यांचं पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कुटुंबाने सांगितलं की, विजय सांगडे नेहमीप्रमाणे सकाळी घरातून ड्युटीसाठी निघाले होते. तेव्हा घरातून निघताना ते म्हणाले की, दरवाजा आतून लावून घ्या, मी येतो. आज त्यांचे हे शब्द कुटुंबियांसाठी अखेरचे ठरले आहेत. ठाण्यात ड्युटीवर पोहोचल्यावर त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले आणि त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने जय आनंद या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना तपासताच मृत घोषित केले.

सांगाडे यांचा मोठा मुलगा महाराष्ट्र सिक्टुरिटी फोर्समध्ये

विजय सांगाडे यांच्या पश्चात त्यांनी पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि नातवंड आहेत. विजय सांगाडे यांचा मोठा मुलगा सागर हा महाराष्ट्र सिक्टुरिटी फोर्समध्ये कार्यरत आहे. तर लहान मुलगा शुभम हा पोलीस अकॅडमी चालवतो. अचानक कुटुंबावर कोसळलेल्या दु:खामुळे डोंबिवली आणि पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर त्यांचं पार्थिक डोंबविलीमधील घरात नेल्यानंतर त्यांच्या अंतदर्शनासाठी नातेवाईक, मित्र आणि रहिवाशांनी एकच गर्दी केली होती.

दरम्यान, सागंडे त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ते कर्तव्यकठोर होते असं त्यांचे सहकारी मित्र सांगतात. तर कुटुंबातील सदस्य सांगत होतो की, ते सर्वांशी हसत खेळत राहायचे. शेजारच्यांसीही त्यांचे चांगले संबंध होते, असं सांगण्यात आलंय.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी…

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात एक विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि सह…

    Leave a Reply

    You Missed

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल