१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत ‘एसआयआर’ मसुदा मतदार यादी आणि तफावत अहवाल म्हणजे SIR Draft Roll and Discrepancy Report प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत योग्य रीतीने नोंदवले गेले आहे की नाही, तसेच नावामध्ये कोणती तफावत अथवा त्रुटी आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचीच तयारी आता सुरु आहे.

आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी खास डिजिटल ऑनलाइन सुविधा 

नागरिकांसाठी ‘एसआयआर’ मसुदा मतदार यादी प्रसिद्ध नाव आणि तफावत अहवाल ऑनलाइन तपासण्याचे आमदार अस्लम शेख यांनी आवाहन केलं आहे. तसेच या प्रक्रियेत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना एका क्लिकवर आपल्या नाव आहे की नाही किंवा काही अडचण तर येत नाहीये ना हे तपासता यावं, यासाठी मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने एक विशेष आणि सोपी डिजिटल ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी एक वेबसाईटही दिली आहे.

या वेबसाईटवर भेट देऊन आपले पूर्ण नाव तपासा 

मतदारसंघातील नागरिक (https://aslamshaikh.mahatalent.org](https://aslamshaikh.mahatalent.org) या वेबसाईटवर भेट देऊन आपले पूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) टाकून मतदार यादीतील नावाची स्थिती त्वरित तपासू शकता.तसेच नाव नसल्यास किंवा माहिती चुकीची असल्यास तातडीने दुरुस्ती अर्ज भरण्याचे आवाहन मतदारसंघातील नागरिकांना करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना आता सरकारी कार्यालयांचे खेटे न मारता घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा संगणकावरून मतदार यादीतील स्वतःची स्थिती तपासता येणार आहे.

अशी तपासा तुमच्या नावाची स्थिती:

मतदारांना https://aslamshaikh.mahatalent.org या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भेट द्यावी लागेल.

संकेतस्थळावर गेल्यानंतर मतदाराला आपले नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC No.) टाकावा लागेल.

क्षणार्धात संबंधित मतदाराचे नाव, भाग क्रमांक, पोलिंग स्टेशन तसेच मतदार यादीतील सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.

नावात त्रुटी असल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे आवाहन

प्रसिद्ध झालेल्या तफावत अहवालात जर नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशीलात काही चूक आढळल्यास अथवा नाव गहाळ असल्यास मतदारांनी तात्काळ संबंधित अर्जाद्वारे निवडणूक विभागाकडे नोंदणी किंवा दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असल्याचे सुनिश्चित करावे, असा संदेश या आवाहनाद्वारे देण्यात आला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी…

    Leave a Reply

    You Missed

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण