पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

पुण्यातील ऐतिहासिक नूतन मराठी विद्यालय (नूमवी) प्रशालेच्या परिसरात आगामी ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पाकिस्तानचे झेंडे लावून कराची शहराचा सेट उभारल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे. शाळेचे संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा पुतळा झाकून हा सेट लावण्यात आल्यामुळे माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी आणि पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेच्या परिसराला पाकिस्तानचे स्वरूप

पुण्यातील प्रसिद्ध नूमवी प्रशाला सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आहे. जय श्री राम नावाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाळेच्या परिसराला पाकिस्तान देशाचे स्वरूप देण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या आवारात पाकिस्तानचे झेंडे लावून तसेच चांद-तारा चिन्ह असलेल्या लाल-हिरव्या पताका वापरून कराची शहराचे चित्रण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शाळेचे संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या पुतळ्यालाही झाकून ठेवण्यात आले आणि त्याठिकाणी पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आला.

शाळेच्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक मूल्यांशी छेडछाड

अप्पा बळवंत चौकाजवळ असलेल्या या शाळेत सुरू असलेल्या चित्रीकरणामुळे माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळेच्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक मूल्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करत या प्रकारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरात एक नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.
शैक्षणिक आणि ऐतिहासिक मूल्यांचा अवमान केल्याची भावना समोर आली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या संस्थेत असा प्रकार घडल्याने शाळेच्या ऐतिहासिक मूल्यांशी छेडछाड झाल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित

राम खाटमोडे आणि सागर पाठक दिग्दर्शित ‘जय श्री राम’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठा सामाजिक आणि राजकीय वाद पेटला असून, चित्रीकरणाला परवानगी देणाऱ्या संस्था चालकांवर आणि संबंधित निर्मात्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असल्याचंही म्हटलं जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर एक मोठा अपघात झाला असून,या अपघातात एक लग्जरी बस थेट उलटली आहे. यात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर आज पहाटे एक मोठा…

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    दिवाळी संपताच ग्राहकांच्या खिशाला काञी लागली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या वाहनचालक आणि गृहिणींचं बजेट आता पुन्हा कोलमडलं आहे. कारण दिवाळी संपते तोच आता CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात…

    Leave a Reply

    You Missed

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार!  ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू