तुकाराम मुंढेंचा पुण्यात मोठा दणका! बुधवार पेठेतील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धाडी; ५१२ किलो अस्वच्छ मिठाई नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे बऱ्याच प्रसिद्ध हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मिठाईचे दुकान सर्वांचेच सत्य आणि ग्राहकांची होत असलेली फसवणूक समोर आली अन् सर्वच आता सतर्क झाले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया आजही सुरुच आहेत.यातून भेसळखोरांची सुटका नाही हे नक्की. यातच आता पुण्यातील मिठाई व्यावसायिकांकडे एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे. थेट अर्धा टन मिठाई नष्ट करण्यात आली.

बुधवार पेठ परिसरातील प्रसिद्ध मिठाई व्‍यावसायिकांवर एफडीकडून कारवाई

बुधवार पेठ परिसरातील प्रसिद्ध मिठाई व्‍यावसायिकांवर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली. अस्वच्छता, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्‍यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यात आढळून आले की, काहींकडे परवानेच नसताना त्यांच्याकडून मिठाईची विक्री केली जात आहे. एफडीएने तब्बल 512.1 किलो मिठाई जप्त करण्यात आली. एफडीएने तब्बल 2 लाख 88 हजार 200 रूपयांची मिठाई नष्ट केली. ही मिठाई नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आली. 8 पथकांकडून ही मोहिम राबवण्यात आली. ज्यात ही कारवाई झाली.

पेठेतील मिठाईची दुकाने आणि उत्पादन केंद्रांची तपासणी केली. यादरम्यान, काही आस्थापनांमधील मिठाई बनवण्याची जागा अस्वच्छ असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर, आवश्यक परवाना आणि नोंदणीशिवाय व्यवसाय करण्याची प्रकरणेही उघडकीस आली.

अस्वच्छ परिस्थितीत मिठाई तयार केली जात होती

यामध्ये परवाना नसताना अनेक मिठाईवाल्या दुकानदारांकडून मिठाईची विक्री केली जात होती. यात थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस मंगल मूर्तीला मिठाई सेंटरला बजावण्यात आली. श्री मंगलमूर्ती यांच्या आस्थापनातही अस्वच्छ परिस्थितीत मिठाई तयार केली जात होती. या कारवाईत अनेक प्रकारच्या मिठाई होत्या. त्यातच खव्याचे मोदक, मोतीचूर लाडू, विविध दुग्धजन्य पदार्थ याचा समावेश होता. बेसनाचे लाडूही आढळून आली. पदार्थांचे 17 नमुने घेण्यात आली. यापैकी काही प्रसिद्ध अशी मिठाई सेंटर आहेत.

१ लाख १८ हजार ८० रुपये किमतीची २१५.१ किलो मिठाई जप्त

झोन-६ च्या पथकाने श्रीमंत पेढेवाले यांच्या आस्थापनातून १ लाख १८ हजार ८० रुपये किमतीची २१५.१ किलो मिठाई जप्त केली. येथील उत्पादन स्थळ अस्वच्छ असल्याचे आढळून आले. पथकाने मोतीचूर लाडू, खावा मोदक आणि उकडी मोदक यांचे नमुने घेतले. धारवाडी पेढा स्वीट्स अँड स्नॅक्समधून २३,८४० रुपये किमतीची ४३ किलो मिठाई जप्त करण्यात आली. येथेही अस्वच्छ परिस्थिती आढळल्याने मोतीचूर लाडू, खावा मोदक आणि उकडी मोदक यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्रावर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले.हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे आढळून आले. ३० नोव्हेंबर रोजी तडजोडीसाठी अर्ज दाखल केला जाईल. श्री कृपा डेअरीमधून मलई मोदक पेढा, केशरी मोदक पेढा, कांडी मोदक पेढा आणि मोकळ्या म्हशीच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.

एकंदरीतच एफडीएच्या पुण्यातील या धडक कारवायांमुळे मोठी खळबळ उडाली असून सर्वच मिठाई विक्रेत्यांचा धाबे चांगलेच दणाणले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा एक अत्यंत मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. सर्वप्रथम, डिलिमिटेशन म्हणजे…

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता थेट स्वयंरोजगाराची ‘चावी’ देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पावसाचा लहरीपणा आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंढेंचा पुण्यात मोठा दणका! बुधवार पेठेतील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धाडी; ५१२ किलो अस्वच्छ मिठाई नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

    तुकाराम मुंढेंचा पुण्यात मोठा दणका! बुधवार पेठेतील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धाडी; ५१२ किलो अस्वच्छ मिठाई नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट