महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईतही महत्त्वाचा निर्णय

नीट पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारीविरोधात कॉकक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या संसद मोर्चापासून सुरू झालेले अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण संपवले आहे.पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला आहे की, जेपी नड्डा यांनी सरकारच्या वतीने त्यांच्याशी बोलण्यास सहमती दर्शवली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. जंतर मंतर येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश 

मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत.

नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन

या आदेशानुसार, विनापरवानगी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येणे, मोर्चे, आंदोलन किंवा सार्वजनिक सभा घेण्यावर निर्बंध राहणार आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक