नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

टोळी वादातून मानेवाडा स्मशानघाटात दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका स्मशानभूमीत बोलावून एका तरुणाची कथितरित्या हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या हल्ल्यात त्याचा साथीदार जखमी झाला. स्मशानघाटात घडलेल्या या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

धारदार शस्त्रे व दगडांनी निर्घृण हल्ला केला.

आधी पवन सूर्यवंशी असे मृताचे तर अमन काळे, असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दहा मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काका ऊर्फ अमन चौरसिया (वय २०), अजय चौरसिया, यश सौदे, पीयूष बघेल (चौघेही रा. ज्ञानेश्वरनगर), वेदांत कापटे (रा. महाकालीनगर), नायडू, रौनक राऊत व अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला मानेवाडा स्मशानभूमीत झाला, जिथे आरोपींनी जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने पवनला बोलावले होते. हल्लेखोर आधीच घटनास्थळी थांबले होते आणि त्यांनी धारदार शस्त्रे व दगडांनी निर्घृण हल्ला केला.

वाद मिटविण्याच्या बहाण्याने घाटावर बोलावलं अन्….

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पवन व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून काका आणि पवन टोळी एकमेकांचा काटा काढण्याच्या तयारीत होती. काकाने वेदांत व साथीदारांच्या मदतीने पवनच्या हत्येचा कट आखला. वाद मिटविण्याच्या बहाण्याने पवनला मानेवाडा घाटावर बोलाविण्यात आले.

वाद इतका विकोपाला गेला की….

शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पवन, अमन काळे, अजय काळे आणि अजय सोलंकी हे चौघे घाटावर आले.तेथे काका, अजय व त्यांच्या साथीदारांनी चौघांना घेरले. ‘माझ्या भावाला का मारले’, अशी विचारणा अजयने पवनला केली. त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला.तो वाद इतका विकोपाला गेला की अजयच्या साथीदाराने पवनच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर इतरांनी चौघांवर शस्त्रांनी हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी चौघेही पळू लागले. मात्र, काका व त्याच्या साथीदारांनी पवनला गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. यात पवनचा मृत्यू झाला. अमन काळेही आरोपींच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला. अजय काळे आणि अजय सोलंकी मात्र आरोपींच्या तावडीतून बचावले.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल 

पवनचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच काका आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला. जखमी अमन काळे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

घटनाक्रमाची तपासणी सुरु 

पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. अधिकारी हल्ल्यापर्यंतच्या घटनाक्रमाचीही तपासणी करत आहेत, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला निर्जन ठिकाणी बोलावण्यासाठी सोशल मीडियाच्या कथित वापराचाही समावेश आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    मुंबई पश्चिम उपनगरात वर्सोवा व मढ यादरम्यान सुमारे दोन हजार ३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित…

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरुच आहे.आता FDA नं थेट जुहू येथील प्रसिद्ध इस्कॉनच्या तीन आस्थापनांवर धाड टाकली असता तेथील अवस्था पाहून त्यांचे परवाने थेट…

    Leave a Reply

    You Missed

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर,  १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल