अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे चेक बाऊन्स प्रकरण अद्याप सुटलेले नाही.या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शहरातील आणि गावातील या दोन मालमत्तांच्या लिलावासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.राजपाल यादववर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईचे 16.61 कोटी रुपये थकीत आहेत. तर राजपालच्या दोन मालमत्तांचं मूल्य अंदाजे 19.26 कोटी रुपये आहे.

चित्रपट बनवण्यासाठी बँकेकडून हे कर्ज घेतले

राजपाल यादवने ‘आता पता लपता’ हा चित्रपट बनवण्यासाठी बँकेकडून हे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला असून लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या नोंदीनुसार,राजपाल यादवच्या शहाजहानपूरमध्ये दोन मालमत्ता आहेत. एक शहरात आणि दुसरी गावात असून, त्यात शेतजमीन आणि एका घराचा समावेश आहे. या दोन्ही प्रॉपर्टींचा लिलाव ९ सप्टेंबर रोजी ऑनलाइन होणार असल्याची माहिती मिळतेय.

कर्जासाठी जामीनदार म्हणून पत्नी आणि आईच्या नावावर मालमत्ता गहाण

राजपालने कर्जासाठी जामीनदार म्हणून पत्नी राधा यादव आणि त्याची आई गोदावरी यादव यांच्या मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. याच्या आधारावर बँकेनं त्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली आहे. शहाजहानपूर व्यतिरिक्त मुंबईतील त्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राजपाल यादवविरोधात चेक बाऊन्सचा खटला दाखल करणाऱ्या कंपनीचा मालकसुद्धा शाहजहानपूर इथलाच आहे. शहाजहानपूर व्यतिरिक्त मुंबईतील त्यांच्या इतर मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

राजपालच्या दोन मालमत्तांचं मूल्य अंदाजे 19.26 कोटी रुपये

राजपाल यादव यांच्या विरोधात चेक बाऊन्सचा खटला दाखल करणाऱ्या कंपनीचा मालक देखील शाहजहानपूरचाच आहे. या घटनेनंतर, हा अभिनेता केवळ कायदेशीरच नव्हे, तर आर्थिक अडचणींचाही सामना करत असल्याचे दिसते. राजपाल यादव यांच्या मालमत्तेवर लिलावाची नोटीस लावल्यापासून चर्चा अधिक तीव्र झाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, कर्ज वसूल करण्यासाठी नियमांनुसार ही कारवाई केली जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    ‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?