जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात आज दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये रवींद्र बहारे (वय ४०) आणि सोनू रशीद पठाण (वय २२) यांचा समावेश आहे. तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने दोन दुचाकींना चिरडले. अपघात इतका भीषण होता की बसने पुढे जाऊन एका रिक्षालाही धडक दिली.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून…

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

    Leave a Reply

    You Missed

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु