“महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात संमत झालेल्या “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधात आज महाविकास आघाडीने ठाम भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजभवन येथे राज्यपाल मा. सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन विधेयकाविरोधात निवेदन सादर केले.

महाविकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक केवळ जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली आणले गेले असले तरी त्याचा थेट फटका नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बसणार आहे. सोशल मीडिया, निषेध मोर्चे, सार्वजनिक भाषणे यावर मर्यादा आणण्याची भीती यामधून व्यक्त होत आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांना दडपशाहीला सामोरे जावे लागेल, असे आघाडीने स्पष्ट केले.

राज्यातील सामाजिक संघटना, विचारवंत, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये या विधेयकाविरोधात तीव्र संताप असून, राज्यपालांनी हा जनतेच्या विरोधातील कायदा मंजूर न करता तो पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवावा, अशी ठाम मागणी या शिष्टमंडळाने केली.

विरोधकांचे म्हणणे आहे की, लोकशाही व्यवस्थेत जनतेचा आवाज हा गळा घोटण्याचे साधन बनू नये, हे विधेयक म्हणजे संविधानिक मूल्यांना धोका आहे.

Related Posts

सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

देवनार पशुवधगृहातील व्यवस्थेचा कॉंग्रेस लोकप्रतिनिधींकडून आढावा देवनार पशुवधगृहात सुविधांचा अभाव मुंबई दि. ०२ जुन : येत्या शनिवारी येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने देवनार पशुवधगृहाच्या संपूर्ण व्यवस्थेचा आज आढावा…

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

राजधानी मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मुंबई पुन्हा एकदा ‘तुंबई’ बनल्याचं चित्र आहे. पावसाचा सर्वाधिक फटका…

Leave a Reply

You Missed

“महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

“महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

ठाकरे बंधूंची भेट: भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निश्चिंतपणाचे वक्तव्य

ठाकरे बंधूंची भेट: भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निश्चिंतपणाचे वक्तव्य

रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची मुंबई-जॉर्डन थेट विमानसेवा सुरू; आठवड्यातून चार फेऱ्या

रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची मुंबई-जॉर्डन थेट विमानसेवा सुरू; आठवड्यातून चार फेऱ्या

पुणे महापालिका निवडणूक : बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले; ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध

पुणे महापालिका निवडणूक : बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले; ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध

जालना जिल्ह्यात हृदयद्रावक घटना : शेतीकाम करताना वडील आणि दोन चिमुकल्यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू

जालना जिल्ह्यात हृदयद्रावक घटना : शेतीकाम करताना वडील आणि दोन चिमुकल्यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू

सोशल मीडियासाठी जीव धोक्यात! अहमदनगरमध्ये रील शूट करताना तरुणाला बसली प्रत्यक्ष फाशी

सोशल मीडियासाठी जीव धोक्यात! अहमदनगरमध्ये रील शूट करताना तरुणाला बसली प्रत्यक्ष फाशी