लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराफ्यावर चढवण्याचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे. समुद्राला आता ओहटी आली आहे. भरतीचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली जागेवरुन हलली. यानंतर ही ट्रॉली तराफ्याच्या दिशेला नेण्यात आली. पाणी ओसरल्यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून कार्यकर्त्यांकडून तराफ्यावर मूर्ती पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. गेल्या आठ तासांपासून कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्न केले जात होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

गेल्या आठ तासांचा काळ हा लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आणि मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक करणारा आणि धाकधूक वाढवणारा होता. लालबागचा राजा तराफ्यात विराजमान झाला असला तरी आता तराफा वाळूवर उभा आहे. त्यामुळे तराफा पाण्यात नेण्याबाबत धाकधूक आहे. तरीही बाप्पा अत्यंत निर्विघ्नपणे विसर्जन पार पाडले, अशी भाविकांना खात्री आहे. दरम्यान, आता लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    “शिक्षणासाठी वयाची अट नसते… फक्त जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते!” ही ओळ जळकोट तालुक्यातील विराळ गावच्या संघशीला पांडुरंग वाघमारे यांनी अक्षरशः खरी करून दाखवली आहे. सन 2004-05…

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

    Leave a Reply

    You Missed

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई