सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे. या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही
CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम आहे. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता वाढत चालली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात सांगण्यात आलं आहे.
३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’
एवढंच नाही तर आज म्हणजे २५ जुलैपर्यंत CJPने ३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. पण जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल यावर सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.
पुढची रणनीती ही असणार
“सरकारने नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे माध्यमे आणि टिव्ही चॅनेल्सवर धर्मेंद्र प्रधान राजनामा देणार नाही, असं म्हटलं जात आहे. असे असेल तर सरकारने याबाबत आम्हाला स्पष्टपणे सांगावे,असे असेल तर अशा बैठका निरर्थक ठरतील. त्यानंतर आमची जी रणनीती असेल त्यावर आम्ही काम सुरू करू. देशातील विद्यार्थ्यांना फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, जो खूप सोपा आहे पण जर तुम्ही तसं करणार नसाल तर आम्हालाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,” असं स्पष्टपणे आशुतोष रांका यांनी सांगितलं.
सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा
आशुतोष रांका पुढे म्हणाले “सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा आहे. आणि याच मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.”
४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत CJP चं मत काय?
सरकारने ४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत देखील त्यांनी मत व्यक्त केलं, ते म्हणाले, “आम्हाला अनेक तपशील तपासावे लागतील, पण आमचा मुद्दा तोच आहे. अंतिम जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची आहे, कारण सर्व पेपरफुटी आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही इतर मोठ्या सुधारणांवर सातत्याने चर्चा करत आहोत.”
CJP ची ठाम भूमिका पाहता आणि आज केंद्र सरकारला देण्यात आलेला अल्टीमेटम पाहता CJP च्या पुढच्या आंदोलनाची दिशा नक्कीच समोर येणार आहे. त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.








