अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. मागच्या एका महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी मागील महिन्याभरासाठी मेहनत घेत आहेत.त्यांना संपूर्ण देशभरातील तरुणांची साथ लाभली आहे.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आणि विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नेतृत्त्व देणारे अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली होती. त्यांनतर त्यांनी आता एक व्हिडिओ शेअर करत टायफॉइडची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

अभिजीत दीपके यांना टाइफाइडची लागण

अभिजीत दीपके यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून टाइफाइड झाल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘माझी तब्येत बिघडली आहे. मला वैद्यकीय अहवालात टाइफाइड झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे माझ्यावर उपचार सुरू आहेत.सकाळ आणि सायंकाळ माझ्यावर उपचार सुरू आहेत’.तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात लढाई सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 20 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर दीपके यांनी अन्नत्याग सुरू केला होता, ज्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती.

अभिजीत दीपकेंची तब्येत बिघडल्याने आंदोलनावर परिणाम होणार?

अभिजीत दीपकेंची तब्येत बिघडल्याने आंदोलनावर परिणाम होणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी हे सातत्याने सरकारशी चर्चा करत आहे. दीपके आजारी असले, तरी त्यांचे इतर सहकारी आंदोलन हाताळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

आज सरकारसोबत CJPची तिसरी बैठक 

या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये तिसरी बैठक होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत नुकसानभरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असली, तरी मुख्य मागणीवर अद्याप तिढा कायम आहे.

धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले, “कालच्या बैठकीत नुकसानभरपाई आणि कायदेशीर प्रकरणांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सैद्धांतिक सहमती झाली आहे. आज लिखित करार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, आमची मुख्य मागणी असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नसतील, तर अशा बैठकांना काही अर्थ उरत नाही.” असं म्हणते CJP धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असणारी योजना आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांसाठी आता एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार