NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

नीट पेपरफुटी प्रकरणातील खटले जलद गतीने चालवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पहिल्याच सुनावणीला पहिल्याच दिवशी फटका बसला आहे.नीट पेपर फुटी प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापन केलं. मात्र सोमवारी पहिली सुनावणी होऊ शकली नाही. पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टच्या कामकाजाला फटका बसला. त्यामुळे सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली.या प्रकरणात सीबीआयचे वकील न्यायालयात हजर न राहिल्यामुळे हे सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राऊझ एव्हेन्यू विशेष कोर्टाला सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलावी लागली आहे.

सीबीआयचे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत

विशेष न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलिगा यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टात नीट पेपर प्रकरणी अटक केलेल्या विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. आरोपींचे वकील एपी सिंह हे न्यायालयात हजर होते. मात्र सीबीआयचे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत. कोर्टाने आदेश दिला की, या प्रकरणी तात्काळ सरकारी वकिलाची नियुक्ती करावी.

आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची तरतूद

दिल्लीच्या राउज अवेन्यू कोर्टात या प्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होणार आहे. पुढील सुनावणीत सरकारी वकील उपस्थित असावेत असं स्पष्ट शब्दात कोर्टानं बजावलंय. या न्यायालयात परीक्षांमधील अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणी सुनावणी होणार आहे.दरम्यान, सरकारने या कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही संसदेत सादर केले असून, त्यामध्ये दंडाची रक्कम पाच पटीने वाढवण्यासह आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची तरतूद केली आहे.

CBI च्या अनुपस्थितीमुळे फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का

NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल दीड महिना विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं.२३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पेपरफुटी प्रकरणांचा लवकर निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती.”ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे, ते तुरुंगात सडत आहेत,” असे सांगत पीएम मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक कायद्याची घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक परीक्षा कायदा,२०२४ अंतर्गत राऊझ एव्हेन्यू कोर्टात हे विशेष न्यायालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी CBI च्या अनुपस्थितीमुळे या आश्वासनाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक