नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

नीट पेपरफुटी मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील परीक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक,सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.याचसंदर्भातील माहिती मोदींनी त्यांच्या या व्हिडीओद्वारे दिलेली आहे. परीक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी नंदन नीलेकणी यांच्यावर सोपली आहे.
आता हे नंदन नीलेकणी नेमके कोण आहेत? त्यांनी याआधी नेमकं काय काय केललं आहे? याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे.

कोण आहेत नंदन नीलेकणी?

नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. त्यांना ‘आधार’ प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार म्हटले जाते. २ जून १९५५ रोजी बंगळूरु येथे जन्मलेले नंदन मोहनराव नीलेकणी हे भारतातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान नेत्यांपैकी एक आहेत. बंगळूरुमध्ये जन्मलेल्या नीलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आणि १९७८ मध्ये मुंबईतील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

इन्फोसिसच्या स्थापनेत मोठा हातभार

१९८१ मध्ये, नंदन नीलेकणी यांनी नारायण मूर्ती आणि इतर पाच सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली, जी पुढे भारतातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक बनली. २००२ मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी नीलेकनी यांनी अनेक नेतृत्व पदे भूषवली होती. CEO म्हणून त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात, इन्फोसिसचा महसूल सहा पटीने वाढून जवळपास ३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. २०१७ मध्ये माजी CEO विशाल सिक्का यांच्या निवृत्तीनंतर, नीलेकनी गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून इन्फोसिसमध्ये परतले.

UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिलं

UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. नंदन नीलेकणी यांनी जगातील सर्वात मोठा बायोमेट्रिक ओळख कार्यक्रम असलेल्या आधारची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यास मदत केली. आज,आधार हा भारताच्या डिजिटल प्रशासन परिसंस्थेचा कणा बनला असून,तो एक अब्जाहून अधिक लोकांना थेट लाभ हस्तांतरण, आर्थिक समावेशन आणि ओळख पडताळणीची सुविधा पुरवतो.

UPI च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली

भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यातही निलेकानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अशा आराखड्याला प्रोत्साहन देण्यात मोलाचा वाटा उचलला, ज्यामुळे अखेरीस युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच ज्याला आपण आज ‘UPI’ म्हणतो त्याचा विकास झाला आणि देशभरातील डिजिटल पेमेंटमध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आलं.

काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक

2014 सालच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. समाजकार्यातही त्यांचे मोठे योगदान असून 2023 साली त्यांनी आयआयटी मुंबईला तब्बल 315 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याआधीही त्यांनी 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

निलेकानी त्यांची जबाबदारी कशी पार पाडणार?

नंदन नीलेकणी यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील मोठे डिजिटल प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याचा अनुभव आहे. तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सरकारने नंदन नीलेकणी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता ते ही जबाबदारी कशी पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

मुंबई पश्चिम उपनगरात वर्सोवा व मढ यादरम्यान सुमारे दोन हजार ३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित…

Leave a Reply

You Missed

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर,  १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

“काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

“काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?