शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित आंतरजिल्हा शिक्षक बदली घोटाळ्यात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केली आहे. चौकशीअंती दोषी आढळलेल्या १३६ शिक्षकांपैकी पहिल्या टप्प्यात ३३ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनय नावंदर यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणे देत थेट बनावट प्रमाणपत्र सादर केले केले आहेत.

बदल्यांसाठी तब्बल २६८ शिक्षकांची बनावट कागदपत्रे

आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. या तपासादरम्यान तब्बल २६८ शिक्षकांनी बदलीचा फायदा मिळवण्यासाठी बनावट व खोटी कागदपत्रे जोडल्याचे उघडकीस आलं.

खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव

अनेक शिक्षकांनी तर स्वतःला दिव्यांग दाखवून बदल्या मिळवल्या.तर काही महिला शिक्षकांनी चक्क परित्यक्ता किंवा एकल महिला प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी पतीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे दावे केले.

चुकीचा रहिवासी पुरावा

एवढंच नाही तर काही शिक्षकांनी वास्तव्याचीच चुकीची माहिती देऊन पात्रतेचे बनावट दावे केले आहेत.या प्रकरणी तक्रारदार गणेश कुरई यांनी शिक्षण व आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

२६८ पैकी १३६ शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी थेट दोषी निष्पन्न

या चौकशीत आता अधिकाऱ्यांनंतर आता शिक्षकांवरही गाजली कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. २६८ पैकी १३६ शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी थेट दोषी निष्पन्न झाले.प्रशासनाने यापूर्वीच कडक भूमिका घेत प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. दरम्यान या प्रकणात ३३ शिक्षकांचे निलंबन आणि ६५ जणांची वेतनवाढ रोखल्यानंतर, उर्वरित दोषी शिक्षकांवरही लवकरच शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

थेट FIR ची मागणी

प्रशासकीय कारवाईनंतर आता या घोटाळ्याला राजकीय व कायदेशीर वळण मिळालं असून भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केवळ निलंबन किंवा वेतनवाढ रोखणे पुरेशी कारवाई नसल्याचे म्हटलं आहे. दोषी शिक्षक आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेटही घेणार आहेत.

या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणेतील पारदर्शकता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारे गैरव्यवहार पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता पोलीस प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या…

    Leave a Reply

    You Missed

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ