अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली असून अभिजीत दीपकेंनी आपल्या पार्टीची आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंपर्क मोहीम राबविण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्न थेट जाणून घेतले जाणार असून शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, लोकशाही संस्था आणि माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही सरकारला झुकवले….

पत्रकार परिषदेत बोलताना दिपकेनं दावा केला की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनातून आम्ही सरकारला झुकवले. तो केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता, तर नागरिकांच्या मनातील भीती संपवण्याचा तो मोठा विजय होता. त्यामुळे प्रधानांचा राजीनामा हाच आमचा विजय आहे” आता देशातील नागरिक प्रश्न विचारण्यासाठीच नव्हे, तर गरज पडल्यास रस्त्यावर उतरतील,असा विश्वास त्याने व्यक्त केला.

तसेच “या देशात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेण्यासारखं आहे. या देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं म्हणत CJP च्या आंदोलनामुळे लोकांच्या मनातील भीती कमी झाली असल्याचं दीपकेनं म्हटलं.

CJP ची रणनीती ठरली

दरम्यान CJP ची रणनीती ठरली असून आगामी काळात देशभरात सीजेपी देशभरात मोहीम राबवणार आहे.’क्या बोलती पब्लिक’ नावाने CJP कॅम्पेन राबवणार असल्याची घोषणा अभिजीत दीपकेनं केली आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते देशभर दौरा करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. “आज अनेक राजकीय पक्ष लोकांपासून दूर गेले आहेत. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, मात्र त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याबद्दल कोणीही गंभीरपणे बोलत नाही. सरकारचे लक्ष केवळ हिंदू-मुस्लिम राजकारणावर आहे,” अशी टीका दिपके यांनी केली.

CJP सुरु करणार आहे ही मोहिम 

दिपकेनं न्यायव्यवस्था, माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी पक्षाचे नेते सौरव दासने कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने मोहीम सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली. विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असे आवाहन त्यांनी केले. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘क्या बोलती पब्लिक’

कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा संविधानावर आधारित असल्याचे सांगताना दिपके म्हणाले की, पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय हीच पक्षाची मूलभूत तत्त्वे असतील,असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दिपकेने न्यायव्यवस्था,माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं.

मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावं

दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीसोबत ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असं आवाहन त्यांनी केलंय. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही CJP ने स्पष्ट केले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार