शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

बुधवारी ५ ऑगस्ट २०२६ शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान त्यानंतर आज गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे.आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टानं मोठं विधान केलं आहे. “आम्हाला अपात्रात ठरवायची आहे”, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले

या प्रकरणावर बोलताना न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी म्हटलं की, “या मुद्द्यावर आम्हाला स्पष्टता हवी आहे. ‘सुभाष देसाई’ प्रकरणाचा विचार करता, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले होते की, सदस्यत्व स्वेच्छेने सोडणे म्हणजे राजकीय पक्षाशी असलेले संबंध आपोआप संपुष्टात येणे नाही. जर तसे नसेल, तर अध्यक्ष नेमके काय ठरवतात?. तसेच अध्यक्षांनी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या वर्तनाच्या आधारे निर्णय घ्यायचा होता. प्रथम, पक्षप्रमुखांनी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या नोटिशीला प्रतिसाद न देणे, हे पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याचे मानता येईल का? दुसरे म्हणजे, अचानक दुसऱ्या राज्यात जाणे आणि कथितरीत्या दुसऱ्या पक्षाशी संबंध प्रस्थापित करणे. या घटनांच्या आधारेच अपात्रतेचा दावा करण्यात आला आहे का?” असे अनेक सवाल यावेळी जॉयमल्या बागची यांनी उपस्थित केले.

कपिल सिब्बलांचं स्पष्टीकरण

जॉयमल्या बागची यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं की,”नाही त्या व्यतिरिक्तही इतर कृती होत्या.त्यांनी स्वतःचा ठराव मंजूर केला आणि दुसऱ्या व्यक्तीची प्रतोद म्हणून नियुक्ती केली.” असं सिब्बल यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा आहे : न्यायमूर्ती बागची 

यावर बोलताना न्यायमूर्ती बागची यांनी असंही म्हटलं की, “सुभाष देसाई प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न ठरवलेला नव्हता. न्यायालयाने असे म्हटले आहे की,विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यात संबंध आहे आणि राजकीय पक्ष हा त्याचा आधार आहे. म्हणूनच, शिंदे गटाने ठाकरे यांनी नियुक्त केलेला प्रतोद बदलण्याचा घेतलेला निर्णय या न्यायालयाने रद्द केला. तसेच न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राणा प्रकरणात दोन निरीक्षणे नोंदवली आहेत. आपल्याला अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा आहे. मात्र, ते आमदार फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतात का, हा वेगळा प्रश्न होता” असंही यावेळी बागची यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाला अधिकार नव्हता, सिब्बल यांचा युक्तिवाद

निवडणूक आयोगाला असा निर्णय घेण्याचा अधिकार (Jurisdiction) नव्हता, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत, आयोगाकडे वादाचा निवाडा करण्याचा अधिकार नसून, जास्तीत जास्त मान्यता काढून घेण्याचा अधिकार असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. अधिकार नसताना निवडणूक आयोगाने अधिकार गृहीत धरून निर्णय दिला, जो अन्यायकारक असल्याचा आरोप केला. संस्थांवर लोकांचा विश्वास निर्माण झाला नाही, तर अशी परिस्थिती निर्माण होते, अशी टिप्पणीही सिब्बल यांनी केली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी उसळली आहे. दरवर्षी देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. त्यात आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी…

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    Leave a Reply

    You Missed

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह