‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे जीवन अधिकाधिक डिजिटल होत असताना सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडवण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि पाटकर-वर्दे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद हायस्कूल, अप्पापाडा, मालाड पूर्व येथे सायबर जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन

या सत्रात विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. हे सत्र क्विक हील फाउंडेशनच्या “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आले होते. “माझा डेटा,माझी जबाबदारी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमामध्ये पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे सायबर वॉरियर्स निखिल गुप्ता आणि आयुष गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व,वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सुरक्षित इंटरनेट वापर आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय प्रभावीपणे समजावून सांगितले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं:

डेटा संरक्षण आणि गोपनीयता : वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स.

ऑनलाइन फसवणूक म्हणजे स्कॅम : डिजिटल स्कॅम्स ओळखणे व त्यापासून बचाव करणे.

सोशल मीडियाचा सुरक्षित वापर : सोशल मीडियावर जबाबदारीने कसे वागावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

सायबर गुन्ह्यांची नोंद : सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्याची योग्य प्रक्रिया कशी असते हे देखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं.

यावेळी शाळेच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी सायबर साक्षरता अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच क्विक हील फाउंडेशन आणि पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या या संयुक्त उपक्रमाबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

तरुण पिढीला सुरक्षित, सजग बनवण्यासाठी योगदान 

“Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमाद्वारे क्विक हील फाउंडेशन आणिपाटकर-वर्दे महाविद्यालय सातत्याने विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत असून, तरुण पिढीला सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…

    Leave a Reply

    You Missed

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण