अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा करण्यात आला होता मात्र अवघ्या १८ ते २० दिवसांतच या दाव्याची धूळधाण उडाली आहे. उद्घाटनानंतर तब्बल ८४ ठिकाणी रस्ता खचल्याने या हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमध्ये. बहुचर्चित लखनऊ-कानपुर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करताना उत्तर प्रदेशातील नॅशनल हायवे अमेरिकेसारखे होतील असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला गेला होता. मात्र, भाजप खासदारांच्या भावाने बांधलेल्या या रस्त्याची अवघ्या १८ ते २० दिवसांतच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर दुरुस्त केलेला हा डांबरी रस्ता सुकवण्यासाठी चक्क पंख्यांचा वापर केला जात असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे.

अखिलेश यादवांचा टोला: “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा!”

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर हा व्हिडिओ शेअर करत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा आहे! ज्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले, तो वाळवण्यासाठी पंखे लावावे लागत आहेत, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे.”, असा टोला यादव यांनी लगावला आहे.

६३ किमीचा रस्ता अन् ४,७०० कोटींचा खर्च; परिस्थिती नेमकी काय?

६३ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेसाठी ₹४,७०० कोटी खर्च झाले आहेत. म्हणजे १ किमी रस्त्यासाठी तब्बल ७५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. अवघ्या १८ दिवसांत कानपूर लेनवर ३९ ठिकाणी तर लखनऊ लेनवर ४५ ठिकाणी रस्ता खचल्यामुळे दुरुस्ती करावी लागली आहे. ३० जुलै रोजी एक मालवाहू ट्रक या रस्त्यावर खचला होता.यानंतर NHAI ने १००० स्क्वेअर फूट रस्ता उखडून २ फूट खड्डा भरून पुन्हा तयार केला, पण अवघ्या १२ तासांत तिथेही पुन्हा १ ते २ इंचाच्या भेगा पडल्या आहेत.

भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

एका बाजूच्या प्रवासासाठी २७५ रुपये टोलही घेण्यात येत होता. मात्र, रस्ता खराब झाल्याने आणि डायव्हर्शनमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने NHAI ने काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कडक पावले उचलली आहेत. एक्सप्रेसवे बनवणाऱ्या ‘PNC इन्फ्राटेक लिमिटेड’ या कंपनीला ‘नॉन-परफॉर्मर’ घोषित करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली आहे. ही कंपनी भाजप राज्यसभा खासदार नवीन जैन यांचे भाऊ प्रदीप जैन यांची आहे. या नात्यातूनच हे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीसह दोन उपकंपन्यांवर दोन वर्षांपूर्वीच बंदी आणण्यात आली होती, नंतर ती उठविण्यातही आली. रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचा ३ कोटींचा संपूर्ण खर्च कंत्राटदार कंपनीकडूनच वसूल केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रस्ता का खचला? 

NHAI च्या प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे रस्त्याखालच्या मातीच्या थरांमध्ये पाणी साचलं आहे. ज्यामुळे मातीची पकड सैल झाली अन् रस्ता खचण्याची समस्या निर्माण झाली. मात्र, एवढा प्रचंड खर्च करूनही रस्ता खचण्याचे तांत्रिक आणि खरे कारण शोधण्यासाठी IIT खडकपूरच्या तज्ज्ञांच्या टीमला चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ‘लेझर प्रोफिलोमीटर’ तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण ६३ किमीच्या रस्त्याची तपासणी केली जाणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी…

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील एका पोलीस अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ५७ वर्षे पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे असं त्यांचं नाव असून ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं अन्…

    Leave a Reply

    You Missed

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर