मुलांना शाळेत पाठवू नका! मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी

मुंबईच्या महापौरांना पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल अकाऊंटवर त्यांचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. महापौरांच्या कार्यालयासोबतच मुंबई मेट्रो, शाळा, शेअर बाजार देखील उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. १५ ऑगस्टपूर्वी हा सोफ्ट घडवून आणला जाईल असा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.

महापौरांना दोन वेळा धमकीचे ई-मेल

या मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यामुळे या मेलचं गांभीर्य अधिक आहे. यापूर्वीही महापौरांना दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. ई-मेलचा आयपी, स्रोत आणि प्रेषकाचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जाईल. या ईमेलमध्ये मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू देऊ नका असा इशारा देखील देण्यात आला आहे.

2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्यामुळे रितू तावडे यांच्यावर आरोप

रितू तावडे यांचं नाव अलीकडे महापौर बंगल्याच्या वादामुळे चर्चेत होतं. महापौर बंगल्याच्या कामासाठी 2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्यामुळे रितू तावडे यांच्यावर आरोप झाले. त्यांच्यावर टीका सुरु होती. या सर्व वादामुळे अखेर रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेचं ते वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश दिले.”हे काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा चुकून यामध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत” अस स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलं आहे.

या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू

यापूर्वी मुंबईच्या महापौरांना दोनवेळा धमकीचा ई-मेल आला होता. या धमकीच्या मेलनंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून त्यांना या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ई-मेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठवण्यात आला आहे. याचा सोर्स काय आणि हा कोणी पाठवला आहे याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…

    Leave a Reply

    You Missed

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण