तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यापासून एफडीए विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त पदार्थ असो, धान्य,दारू असो किंवा थेट हॉटेलचे परवाने रद्द करणं असो. तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांत गुटखा, भेसळ, पनीर, औषधे आणि हॉटेल्सवरील अनियमितता आणि बेकायदेशीरबाबत ठेवत कारवाई करण्यात आली आहे. तर आता एफडीएने IIT बॉम्बे कॅम्पसकडे मोर्चा वळवला असून दोन कँटीनवर FDA ने कारवाई केली आहे.

आयआयटी मुंबईच्या कॅन्टिनवर कारवाई

एफडीएकडे आलेल्या तक्रारीनुसार आयआयटी मुंबई, पवई येथे ३ हॉस्टेल मेसच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी दरम्यान दोन ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्या अंतर्गत बंधनकारक असल्येल्या अन्न परवाना , नोंदणी नसल्याचं आढळून आल्याने सदर दोन मेस येथील अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या मेसमध्ये आढळून अल्येल्या त्रुटींच्या अनुषंगाने सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.

कँटिन चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश

तक्रारीनंतर FDA अधिकाऱ्यांनी IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये तपासणी केली, तपासणीत परवाना आणि अन्न सुरक्षा नियमांतील त्रुटी उघड झाल्यानंतर संबंधित कँटिन चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे, तसेच प्रकरणाचा पुढील तपास FDA कडून सुरू आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या कारवाया; या हॉटेलांचे परवाने रद्द

मुंबईतील चार हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यामध्ये दादरमधील Eat Nino या हॉटेलचा समावेश आहे. इथं तपासणी दरम्यान अस्वच्छ परिस्थिती, कीटकांचा वावर, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नाची आणि पिण्याच्या पाण्याची अनिवार्य चाचणी केल्याच्या नोंदी नसणे, FOSTAC प्रशिक्षण व वैद्यकीय नोंदी उपलब्ध नसणे, तसेच GMP आणि GHP पद्धतींची अंमलबजावणी न करणे, इ. उल्लंघने आढळून आल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आले.

कुर्ला वेस्ट येथील साऊत इंडियन डोसा कॉर्नरवरही कारवाई

दरम्यान, कुर्ला वेस्ट येथील साऊत इंडियन डोसा कॉर्नरवरही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलच्या तपासणी दरम्यान कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी/लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले नाही तसेच प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. उपकरणे व आस्थापनेची स्वच्छता निर्धारित स्वच्छता कार्यक्रमानुसार करण्यात येत नसल्याचे आढळून आले. आवश्यक अभिलेख (Records) व दस्तऐवज उपलब्ध ठेवण्यात व जतन करण्यात आलेले नाहीत, इ. सुधारणा नोटीस मध्ये नमूद केलेल्या तुटींची विहित मुदतीत पूर्तता न केल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आला आहे.

पान मसाल्याविरोधातील कारवाईत 19 एफआयआर दाखल

प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील कारवाईत 19 एफआयआर दाखल करण्यात आले असून 20.29 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. तर दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, मसाले, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांवर कारवाई करत 2.62 कोटींचा साठा जप्त करण्यात आला. याच मोहिमेत राज्यभरातील 63 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 38 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 7 आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने निलंबित करण्यात आले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…

Leave a Reply

You Missed

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण