अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेत राजकीय आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी काय आहे प्लान 

सकाळी 11 वाजता नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अमित शहांच्या हस्ते अधिकृतरित्या उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या संस्थेचं नवीन कार्यालय बांधण्यात आलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार आमि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर, तसेच मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देखील ते हजेरी लावणार आहे. दोन्ही कार्यक्रमांत सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार असल्याचे कळतंय. या दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे.

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विमानाने मुंबईत पोहोचले. मुंबई अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं. शहा यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी स्वागताला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील होते.

पुण्याचा दौरा विरोधकांच्या आंदोलनामुळे चर्चेत

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते.त्यांच्या पुण्याचा दौरा विरोधकांच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिला. पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने अमित शहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आंदोलन केलं. तसेच त्यांनी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात अमित शहा यांनी देशातील घडामोडींवर भाष्य केलं नव्हतं. परंतु आता मुंबईतील दौऱ्यावर देशातील घडामोडींवर काय भाष्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने…

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    ‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात…

    Leave a Reply

    You Missed

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार