कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय आव्हाने लक्षात घेता मालाड विधानसभेतील विविध पदांच्या नियुक्त्या कार्यक्षेत्रानुसार आणि योग्य जबाबदारीचे वाटप करून करण्यात आल्या आहेत. पक्षाचे विचार, ध्येय धोरणे आणि कार्यक्रम तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवावेत, असा स्पष्ट संदेश पक्षाच्या वरिष्ठांकडून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. तसेच पक्षीय नियोजनाचा हा एक भाग असून, याद्वारे स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील उद्देश आहे.

१४ पदाधिकार्‍यांवर नवीन जबाबदारी

या संघटनात्मक फेररचनेत एकूण १४ कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आधी शाखाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील घोंगे आणि वकील . सुशिंदर मुत्तुस्वामी यांची मालाड विधानसभेच्या विभाग सचिवपदी पदोन्नती करण्यात आली आहे. याशिवाय मुकेश शेलार यांची प्रभाग क्रमांक ३४ च्या शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे मालाडमधील मनसेच्या संघटन कौशल्याला नवी ऊर्जा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सर्व नियुक्त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत.

कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

नवीन नियुक्त्यांची घोषणा करताना पक्षाकडून अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय-धोरणे, विचार आणि उपक्रम आपण सर्वांनी वेळोवेळी आपापल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने व प्रामाणिकपणे राबवावेत. पक्ष कार्यात कोणतीही कुचराई, हलगर्जीपणा अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असा कडक इशारा तथा जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे.

लोकांना त्रास नको, वर्तनाबाबत स्पष्ट सूचना

पदाधिकार्‍यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात त्यांच्या वर्तणुकीबाबतही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. “आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून समाजातील कोणत्याही घटकाला किंवा नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे,” असं पक्षाने बजावून सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी लढताना पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियुक्त्या एका वर्षाच्या कालावधीसाठी असणार

या सर्व नियुक्त्या एका वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत. या १ वर्षात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा सविस्तर कार्यअहवाल,आढावा पक्षाकडून तपासला जाणार असून या अहवालाचे आणि प्रत्यक्ष कामगिरीचे मूल्यमापन करूनच संबंधित पदाधिकाऱ्याला पुढील मुदतवाढ द्यायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचं पक्षानं सांगितलं आहे. तसेच या नियुक्त्या झाल्यानंतर पक्षाने सर्व १४ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच