समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यापासून या महामार्गाबद्दल कायम काही ना काही अडचणीच ऐकायला मिळाल्या आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि कमी वेळात अधिक अंतर गाठता यावे यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनवण्यात आला होता. मात्र कधी अपघात तर कधी येथील समस्यांमुळेच हा महामार्ग अधिक चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर आवश्यक सुविधाही नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

बऱ्याच वेळेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

जसं, अनेक रस्त्यावर कठडे लावून ठेवले जातात. तर थोड्या चुकांसाठीही प्रवाशांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतो. असाच काहीसा वादाचा प्रकार रविवारी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडला. यामुळे ट्रक चालकाने चक्क त्याचा मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला. यामुळे अनेक काळ वाहतूक कोंडी झाली होती.

नेमकं काय घडलं?

समृद्धी महामार्गावर एका ट्रकचालकाने चक्क ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा लावून चावी घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६० जवळ घडली.

संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालकाचा आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला आणि वाहनाची चावी घेऊन तेथून निघून गेला. ट्रक आडवा असल्याने महामार्गावरील एका मार्गाची वाहतूक पूर्णपणे जाम झाली. तब्बल दीड तासापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे. अचानक वाहतूक थांबल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. घटनास्थळी वाहनांच्या रांगा वाढतच होत्या. मोठ्या कष्टाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

आरटीओसोबतचा चालकाचा वाद पण इतरांना मनस्ताप 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आलं. चालक नेमका कुठे गेला आणि आरटीओसोबत त्याचा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.या वादामुळे इतर प्रवाशांना मात्र हाकनाक मनस्ताप सहन करावा लागला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    भयानक!  दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही