गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोने खरेदीबाबत मोठे आवाहन केलं होतं. गरज नसेल तर सोने खरेदी टाळा, असे त्यांनी म्हटलं होतं. फक्त हेच नाही तर विदेशातील लग्नही टाळण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल मोठं आवाहन केलं होतं. सोने खरेदीबाबत सरकारकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे. परदेशी चलनावरील दबाव टाळण्यासाठी सरकार अशी पाऊले उचलत असल्याचं बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोन्याच्या खरेदीबाबत पुन्हा एकदा मोठं आवाहन

इंपोर्ट ड्युटी सोन्यावरील कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे. सोन्यावर 6 टक्के इंपोर्ट ड्युटी होती, लोकांनी सोने खरेदी टाळावे, याकरिता सरकारने ती थेट 15 टक्के केली. मात्र, सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट बेकायदेशीर गोष्टी अधिक घडताना दिसल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत पुन्हा एकदा आवाहन केले. आवश्यकता असल्याशिवाय सोनं खरेदी करू नये असे पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले.

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाचा परिणाम सराफा बाजारावर

मात्र पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाचा परिणाम सराफा बाजारावर दिसून आला आहे. आवाहनानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज मंगळवार १ सप्टेंबर २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये या आवाहनाचा परिणाम दिसून आला. आज एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव ३१० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,५४,१५० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा भाव किंचित वाढून प्रति किलोग्रॅम २,३४,०५९ रुपयांवर आला आहे.

सोन्याचे अन् चांदीचे दर काय?

आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचीत दरवाढ दिसून आली. २४-कॅरेट सोन्याचा भाव १६ रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम १५,६९३ रुपये झाला, म्हणजेच प्रति १० ग्रॅम १,५६,९३० रुपये. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव १५ रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम १४,३८५ रुपये झाला, म्हणजेच प्रति १० ग्रॅम १,४३,८५० रुपये. १८-कॅरेट सोन्याचा भावही १२ रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम ११,७७० रुपये झाला.

किंचीत घसरण

तर, चांदीच्या दरातही आज किंचीत घसरण दिसून आली. चांदीच्या दरात प्रतिकिलो ५००० रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा दर हा २,५०,००० रुपये इतका आहे.म्हणजे 10 ग्रॅम चांदीचा दर 2500 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीचा दर 25000 रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात 5000 रुपयांची घट होऊन 250000 रुपये झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर चांदी नक्कीच स्वस्त होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

सोन्याच्या दरावर दबाव

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात सध्या सोन्याच्या दरावर दबाव असल्याचे दिसून येत आहे. एका वृत्तानुसार, बाजार विश्लेषक टोनी सायकामोर यांनी सांगितले की, फेडरल बँकेची भूमिका आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेला तणाव याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेतील काही महत्त्वाच्या आकड्यांवर

गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेतील काही महत्त्वाच्या आकड्यांवर लागले आहे. रोजगाराशी संबंधित डेटा, एडीपी रोजगार रिपोर्ट, नॉन परफॉर्म डेटा आदीशी संबंधित अहवाल येण्याची शक्यता आहे. या आकडेवारीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याज दराबाबतचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ज्याचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होईल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाच्या महाप्रलयाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती धोका निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDRRMA) पुन्हा…

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    NCLT ने झी ग्रुपचे Zee Group संस्थापक आणि मिडिया उद्योगपती सुभाष चंद्र यांना वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएलटीने सुमारे २,२०,०६.५७ कोटी रुपयांच्या कर्जाचे निराकरण करण्यासाठी अवघ्या ६.५…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…