दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. त्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हायकोर्टाचे आभार मानले आहेत. तर वकील निलेश ओझा यांनी प्रतिक्रिया देत सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर आम्हाला प्रोटेस्ट याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल असं देखील म्हटलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रिय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिनांक २ सप्‍टेंबर दिले आहेत. आता या प्रकरणाचा पूर्ण तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून केला जाणार असून, न्यायालयाने या संदर्भात एफआयआर नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश सीबीआयला दिले आहेत.

यासोबतच, आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित असलेली मालवणी पोलीस ठाण्यातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे तात्काळ सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी दिशाचे वडील सतीश सलियन यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश

जून २०२० मध्ये मालाड येथील १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली. सीबीआयने दिशाचे वडील सतीश सालियन यांचा सविस्तर जबाब नोंदवावा, यानुसार एफआयआर दाखल करावे आणि या तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावा, असे निर्देश न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले असल्‍याचे ॲड. ओझा यांनी सांगितले.

पुराव्यांच्या आधारे कारवाई

या प्रकरणी ज्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळतील त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्यांच्याविरुद्ध पुरावे नाहीत, त्यांना निष्कारण आरोपी म्हणून गोवले जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.तपासाअंती जर सीबीआयने ‘नकारात्मक अहवाल’ (Negative Report) सादर केला, तर त्यावर आक्षेप घेण्याचा आणि ‘प्रोटेस्ट पिटिशन’ (Protest Petition) दाखल करण्याचा अधिकार आम्हाला राहील, असा स्पष्ट उल्लेख न्यायालयाने आपल्या आदेशात केला आहे.

न्यायालयात धाव घेतल्यानंतरच शवविच्छेदन अहवाल मिळाला , ॲड.ओझा

याचिकाकर्त्यांचे वकील नीलेश ओझा यांनी दावा केला की, दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर पाच वर्षांनी आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतरच पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल मिळाला. तसेच, याचिकाकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि इतरांवर संशय व्यक्त करूनही पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हत्येचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही,  सरकारी वकील

दिशाच्या प्रकरणात कोणावरही खटला भरण्यासारखा कोणताही पुरावा मिळालेला नाही. दिशाने आत्महत्या केली किंवा ती अपघाताने खाली पडली असा निष्कर्ष निघतो. तसेच, ऑक्टोबर २०२० मध्ये बंद केलेली एडीआर चौकशी सोशल मीडियावरील आरोपांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती, पण त्यातही हत्येचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही, असे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले. तर याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा, ठाकरे यांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी केला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं…

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाचा २…

    Leave a Reply

    You Missed

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?