“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनय कौशल्यासोबतच सोशल मीडियावर स्पष्ट राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आयटी सेल (IT Cell), आणि सध्याच्या राजकीय नरेटिव्हवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्ट्स सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

पोस्टच्या माध्यमातून आयटी सेलवर जोरदार हल्लाबोल

किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि त्यांच्या समर्थकांसह आयटी सेलवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या उझबेकिस्तान दौऱ्याचा आणि तिथून मिळालेल्या सर्वोच्च पुरस्काराचा संधर्भ जोडत, किरण माने यांनी आयटी सेलच्या कार्यपद्धतीवर आणि नरेटिव्हवर अत्यंत उपरोधिक शैलीत आक्षेप घेतला आहे.

 फायद्यासाठी सच्चा हिंदू उझबेकिस्तानला जाऊन…

आयटी सेलच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना माने म्हणाले की,”हे नाय पटत आपल्याला. निषेध. दोस्त कितीही मोठा असला तरी त्याच्या फायद्यासाठी सच्चा हिंदू उझबेकिस्तान ला जाऊन, बाबराचे पाय चाटेल का? आपल्या देशातलं अब्जावधी रुपयांचं भांडवल बाबराच्या देशात टाकून, त्यांना मालामाल करून, कवडीमोलाचा हार कुणी गळ्यात घालून घेईल का? नाय नाय…
आय टी सेल वालो…कह दो के ये झूठ है” असं म्हणत त्यांनी अशी बोचरी टीका करत किरण माने यांनी आयटी सेलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

उझबेकिस्तान दौरा आणि ‘बाबर’ या विषयाचा संदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान तेथील सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय वाद पेटला आहे. मुघल सम्राट बाबरचे मूळ जन्मस्थान फरगाना खोरं हे सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि संघावर निशाणा साधला होता. माने यांनी याच राजकीय मुद्द्याचा संदर्भ घेत आयटी सेलच्या दुटप्पीपणावर थेट ताशेरे ओढले आहेत.

आयटी सेलच्या जुन्या नरेटिव्हवर हल्लाबोल

माने यांनी आपल्या इतर पोस्ट्समधूनही आरोप केला आहे की आयटी सेलकडून खोट्या सर्वेक्षणांच्या बातम्या पसरवून आणि गोदी मीडियाचा वापर करून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदू-मुस्लिम वाद, शरिया किंवा राहुल गांधींवरील ट्रॉलिंग यांसारखे जुने आणि आऊटडेटेड मुद्दे आता चालत नसून नवीन पिढी म्हणजे GenZ आणि सामान्य देश अशा प्रोपोगंडाला नाकारत आहे, असा दावा त्यांनी केला.

माने यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर वाद

किरण माने यांच्या या सडेतोड आणि बोचऱ्या टीकेनंतर सोशल मीडियावर दोन गट आमनेसामने आले आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे, तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी आणि आयटी सेलच्या युझर्सनी किरण माने यांच्यावर जोरदार पलटवार करत त्यांच्यावर टीका केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाचा २…

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. त्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हायकोर्टाचे आभार मानले आहेत. तर वकील निलेश ओझा यांनी प्रतिक्रिया देत सीबीआयचा तपास…

    Leave a Reply

    You Missed

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?