राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

महाराष्ट्रातील कष्टकरी मच्छीमारांच्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. दादर येथील टिळक भवनात महाराष्ट्र आणि मुंबई मच्छीमार काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. वाढती डिझेल दरवाढ, मच्छीमार कर्जमाफी, वाढवण बंदर प्रकल्प आणि मनोरी येथील खारपाणी गोडीकरण प्रकल्प यांसारख्या विविध प्रश्नांवर या बैठकीत खलबते झाली. आता या प्रश्नांवर थेट केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेण्याचा निर्धार मच्छीमार काँग्रेसने केला आहे.

मच्छीमारांच्या गंभीर प्रश्नांवर काँग्रेसची संयुक्त बैठक

मुंबईतील दादर येथील प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे महाराष्ट्र मच्छीमार काँग्रेस आणि मुंबई मच्छीमार काँग्रेसची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली.

मच्छीमारांसाठी सर्वात मोठा फटका ठरत असलेली डिझेलची दरवाढ हा या बैठकीतील प्रमुख मुद्दा होता. डिझेलला ‘बल्क कॅटेगरी’ मधून वगळून ‘जनरल कॅटेगरी’मध्ये आणावे, जेणेकरून डिझेलचे दर कमी होऊन मच्छीमारांना दिलासा मिळेल, अशी मागणी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून केली जात आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मच्छीमार संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मच्छीमार काँग्रेसकडून केंद्र सरकार आणि प्रशासनासमोर चार प्रमुख मागण्या

बैठकीत मच्छीमार काँग्रेसकडून केंद्र सरकार आणि प्रशासनासमोर चार प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.यातली पहिली म्हणजे
डिझेल दरात कपात: डिझेलला ‘बल्क’ श्रेणीतून हटवून ‘जनरल’ श्रेणीत आणावे आणि दर कमी करावेत.
मच्छीमार कर्जमाफी: मच्छीमार आणि NCDC कर्जाला कृषी कर्जाचा दर्जा देऊन कर्जमाफी योजना लागू करावी.
वाढवण बंदर पुनर्वसन: वाढवण प्रकल्पग्रस्त मच्छीमार, आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांची राहुल गांधींसोबत भेट घडवून आणून प्रश्न मार्गी लावावेत.
मनोरी प्रकल्प रद्द करण्याची मागणी: मनोरी येथील प्रस्तावित खारपाणी गोडीकरण प्रकल्पामुळे स्थानिक मत्स्य व्यवसायावर गदा येत असल्याने हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा.

मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आता आरपारच्या लढ्याच्या तयारीत

या सर्व प्रश्नांसाठी आता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना पत्र पाठवून आपापल्या भागातील स्थानिक प्रश्न २ ते ३ दिवसांत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे सर्व स्थानिक आणि राज्यस्तरीय प्रश्न एकत्रित करून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणून मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आता आरपारच्या लढ्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता राहुल गांधींपर्यंत हा मुद्दा पोहोचल्यानंतर तो कितपत मार्गी लागतोय की तसाच प्रलंबित राहतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?