“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

भारतपेचे सह-संस्थापक आणि शार्क टँकचे माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर यांनी, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर आणि व्यापारी पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या धोरणांवरून केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या निर्णयाला ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या विरोधात,छोट्या दुकानदारांसाठी हानिकारक आणि सरकारसाठी आत्मघातकी पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याबाबत अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला सवाल

देशात झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल व्यवहारांच्या युगात, UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याबाबत आणि २००० पेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारण्याबाबतच्या शिफारसी आणि नियमांवरून वाद निर्माण झाला आहे. फिनटेक क्षेत्रातील अनुभवी आणि भारतपेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी या मुद्द्यावरून सरकार आणि नियामकांवर टीका केली आहे.

खर्च सरकार कुठे करत आहे? सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

सरकारवर टीका करताना ते म्हणाला,”छोट्या दुकानदारांकडून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर शुल्क आकारावे लागेल.सरकार म्हणतं की यात खर्च होतो. काय विनोद करतात हे लोक. हा खर्च सरकार कुठे करत आहे? आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, आरबीआयने सरकारला ३ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला. बँकांव्यतिरिक्त, ४ कोटी असलेले सर्व यूपीआय सहभागी नफा कमावत आहेत. एनपीसीआयचा करपूर्व नफा १,९०० कोटी रुपये आहे. ते म्हणाले की, जेव्हा कोणालाही तोटा होत नाही, तेव्हा तुम्ही छोट्या दुकानदारांना त्याची भरपाई का करायला लावत आहात? सरकारच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “देव देशाचे रक्षण करो.” असं म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत खोचक टीका केली आहे.

एवढंच नाही तर अशनीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. पोस्टद्वारे सरकार आणि एनपीसीआयवर मोठा निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, जर झी समूहाचे प्रमुख सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित २२,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले नसते, तर भारतातील UPI सेवा पुढील २० वर्षांपर्यंत मोफत चालवता आली असती.

२० वर्षांपर्यंत मोफत UPI कसा होऊ शकलं असतं?

सरकारच्या वार्षिक ८,००० कोटी रुपयांच्या सबसिडीच्या हिशोबाने, जर सुभाष चंद्रा यांचे २२,००० कोटी रुपये माफ झाले नसते, तर तो पैसा यूपीआय पुढील २० वर्षे मोफत ठेवण्यासाठी पुरेसा ठरला असता. यूपीआय चालवणाऱ्या NPCI कडे प्रचंड पैसा असून संस्थेच्या पैशातूनच UPI मोफत शक्य असून एनपीसीआय स्वतःच्या नफ्यातून आणि पैशातून आयुष्यभर यूपीआय मोफत चालवू शकते, यासाठी सामान्य लोकांवर नवीन शुल्क लावण्याची गरज नाही.असं म्हणत सर्व हिशोबच ग्रोव्हर यांनी मांडला.

सुभाष चंद्रा कर्ज प्रकरण काय आहे?

एस्सेल आणि झी समूहाशी जोडलेले २२,००० कोटी रुपयांहून अधिकचे दावे दिवाळखोरीच्या प्रक्रियेदरम्यान (NCLT) अत्यंत कमी रक्कम घेऊन म्हणजेच जवळपास ९९.९७% ‘हेअरकट’ म्हणजे माफी देऊन निकाली काढण्याचा प्रस्ताव समोर आला होता. या मोठ्या कर्जमाफीमुळे आधीच तीव्र संताप व्यक्त होत होता.

UPI चार्जेसची चर्चा:नुकतीच मोठ्या रकमेच्या म्गणजे २,००० पेक्षा जास्त व्यापारी यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लावण्याबाबत चर्चा आणि कायदेशीर मंजुरीची बातमी समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांऐवजी व्यापाऱ्यांवर हे शुल्क लागू होणार असले, तरी यामुळे भविष्यात डिजिटल व्यवहारांचा खर्च वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे

अशनीर ग्रोव्हरचा UPI बद्दल काय म्हणाले

अशनीर ग्रोव्हर यांच्या मते,भारतातील UPI च्या यशामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे “मोफत आणि सोपे” स्वरूप आहे. जर व्यापाऱ्यांकडून २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटसाठी इंटरचेंज शुल्क आकारले गेले, तर लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास नाखूष असतील. जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याच्या लक्षात येईल की डिजिटल पेमेंट स्वीकारल्यामुळे त्यांच्या नफ्याचा काही भाग शुल्काच्या स्वरूपात खर्च होतो, तेव्हा ते ग्राहकांना रोख रक्कम स्वीकारण्यास भाग पाडतील. याचा देशाच्या कॅशलेस अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रगतीवर परिणाम होईल.

ग्राहकांवर भार टाकतील किंवा स्कॅनरचा वापर पूर्णपणे बंद करतील

सोशल मीडिया आणि सार्वजनिक मंचांवर बोलताना ग्रोव्हर म्हणाले की, भारताला जागतिक ओळख मिळवून देणारी क्रांतीकारी प्रणाली, यूपीआय, विनामूल्य आणि सर्वांसाठी सुलभ राहील याची सरकारने खात्री करावी. ते पुढे म्हणाले की, शुल्क आकारल्यास डिजिटल पेमेंटमध्ये नव्याने सामील होणारे छोटे व्यावसायिक आणि रस्त्यावरील विक्रेते पुन्हा रोख व्यवहारांकडे वळू शकतात. शिवाय, जर व्यापाऱ्यांवर शुल्काचा बोजा टाकला गेला, तर ते एकतर हा भार ग्राहकांवर टाकतील किंवा स्कॅनरचा वापर पूर्णपणे बंद करतील.

सरकार आणि एनपीसीआयची भूमिका काय राहिली आहे

एनपीसीआय आणि अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की सामान्य बँक-टू-बँक UPI व्यवहार पूर्णपणे विनामूल्य आहेत. तथापि, वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सद्वारे होणाऱ्या २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट आणि इंटरचेंज फीचे नियम लागू करण्यात आले होते.त्यामुळे अशनीर ग्रोव्हर यांचे मत आहे की, व्यापाऱ्यांवरील कोणतेही अप्रत्यक्ष शुल्क किंवा आर्थिक भार अखेरीस ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला हानी पोहोचवत आहे आणि म्हणूनच सरकारने या धोरणाचा पुनर्विचार करावा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी