सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांतील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यातील एक नाव म्हणजे अर्थातच मुंबईचा लालबागचा राजा. सर्वांनाच लालबागच्या राजाचं विशेष आकर्षण असतं. अगदी देश-विदेशातून भाविक लालबागच्या दर्शनासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक गर्दी करत आहेत.लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी ख्याती आहे.

भाविकांकडून पहिल्याच दिवशी बाप्पाच्या चरणी लाखो रुपयांचे दान 

पहिल्याच दिवसापासून सेलिब्रिटी, दिग्गज नेते आणि सर्वसामान्य भाविकांचीनीही राजाचे दर्शन घेण्यासाठी धाव घेतली आहे. भाविकांनी पहिल्याच दिवशी बाप्पाच्या चरणी लाखो रुपयांचे दान दिले आहे. चरणस्पर्श दर्शनासह मुखदर्शनसाठीही राजाचरणी मोठी गर्दी होत असून भाविकांकडून भरभरुन दानही अर्पण केलं जात आहे. आपल्या नवसाची पूर्तता, आणि नवसाची मागणी करत भाविकांकडून रोख, आणि मौल्यवान वस्तूंच्या रुपाने बाप्पाचरणी दान अर्पण केलं जात आहे. आज दुसऱ्या दिवशी तब्बल ८८ लाख ९० हजारांचे दान प्राप्त झाले आहे.

सोने-चांदी दागिने सोबतच रोकडचे किती दान

लालबागच्या राजा चरणी भाविकांकडून भक्तीभावाने आणि मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केलं जात असून पहिल्याच दिवशी ४८ लाख ५० हजार रुपयांचं दान अर्पण करण्यात आलंय. तर, बाप्पाच्या चरणी दुसऱ्या दिवशी देखील भाविकांनी भरभरून दान दिलंय.यामध्ये रोख रक्कम, त्यासोबतच सोने-चांदी दागिने या सगळ्याचा समावेश आहे. मागील वर्षी ४६ लाख रुपयांचे दान पहिल्या दिवशी अर्पण करण्यात आलं होते. लालबाग राजाच्या स्टेज पेटीमध्ये ५९ लाख ७० हजार रुपयांचे दान तर रंग पेटीमध्ये २१ लाख ३० हजार रुपयांचे दान अर्पण झालंय. त्यामध्ये, दुसऱ्या दिवशी २२६ ग्रॅम सोनं आणि ५५१६ ग्रॅम चांदीच्या वस्तू दान करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पहिल्या दोन दिवसांत राजाच्या चरणी १ कोटी ३७ लाख ४० हजार रुपयांचे दान प्राप्त झालं आहे.

सोने चांदी – पहिल्या दिवशीचं दान

सोन ६६.७७० ग्राम
चांदी २८०६.००० ग्राम

दुसऱ्या दिवशी मौल्यवान वस्तू

सोनं – २२६ ग्रॅम
चांदी – ५५१६ ग्रॅम

अशा पद्धतीने दरवर्षी प्रमाणे सोनं, चांदी अन् नोटांचे हार, लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी अर्पण झाल्याचं पाहायला मिळालं.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी