SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

निवडणूक आयोगातील मतभेद आणि SIR च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच. आता ठाकरे बंधुंनी देखील मोठं पाऊलं उचललं आहे. याविरोधात आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकञ येणार आहेत. पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंनी एल्गाल पुकारला आहे.

SIR च्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकञ

SIR च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची घोषणा केली आहे. तारीख ठरली असून ४ ऑक्टोबरला मुंबईत दोन्ही शिवसेना आणि मनसेच्या पुढाकाराने एसआयआरविरोधात जनमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात इतर राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी संवाद साधणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा

एवढंच नाही या मोर्चात इतर राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी संवाद साधणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. याबाबत राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर दोन आयुक्तांनी घेतलेल्या १४ आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर तसेच ‘एसआयआर’ च्या माध्यमातून कोट्यवधी मतदारांची नावे गायब झाल्याच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंंदीसक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकञ येणार आहेत. ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान राज ठाकरे यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहेत. काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे –
सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा.

बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !

अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं कारण समोर आलं…

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाले आहेत.राज्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    Leave a Reply

    You Missed

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना