समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं कारण समोर आलं आहे.
झोप लागल्याने आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं
वेरूळ परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या XUV कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. चालकाला झोप लागल्याने आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या अपघातात मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरला झाप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक समोर आली आहे.
कार थेट कंटेनरमध्ये घुसली
समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये टाकळीवाडी शिवारात इंटरचेंजपासून दोन किलोमीटर अंतरावर शनिवारी २६ सप्टेंबर २०२६ हा भीषण अपघात झाला. नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील आणि दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेल क्रमांक ४४९.५ जवळ हा अपघात झाला. प्रतीक रामकिसन जगदाळे (वय ३१, मुळ रा. जालना, ह. मु. भूगाव बावधन, पुणे) हे पुणे येथून पत्नी आणि मुलासह महिंद्रा एक्सयूव्हीने कारने (क्र. एमएच १२ वायएस १०२८) जालना येथे कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. शनिवारी सकाळी सुरतहून सेलमकडे जाणारा कंटेनर (क्र. जीजे २१ वाय ३३६२) चालक संगप्पा यमगर (वय ३२) हा वाहन चालवत असताना मागून आलेल्या कारने कंटेनरला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर कार कंटेनरच्या मागील बाजूस घुसल्याने कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर
धडकेनंतर कार कंटेनरच्या मागील बाजूस घुसल्याने कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. या अपघातात श्रिया राजेंद्र पांडे-जगदाळे (वय ३२ मुळ रा. जालना, ह. मु. पुणे) आणि त्यांचा मुलगा रुद्रश प्रतीक जगदाळे (वय २) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रतीक जगदाळे यांचा गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील क्यूआरव्ही आणि पेट्रोलिंग पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, सुरक्षा पथकाने घटनास्थळी बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही वाहने आणि त्यातील सामान दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








