दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी दौरा केल्यानंतर राज्यात काही तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत. तर आता उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार

शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींचे लग्न ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा, याची विवंचना त्यांना कायम सतावत असते. दुष्काळ, नापीकी, कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी शिंदेंचा निर्णय

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याचं शिंदेंनी म्हटलं. तसेच ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला होता. त्यानुसार राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून थेट दिलासा देण्यासाठी त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाला शक्य तेवढी मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. उपमुख्यमंञ्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, श्रीवर्धन येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. ‘आधुनिक भारत’ या…

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं कारण समोर आलं…

    Leave a Reply

    You Missed

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी