‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, श्रीवर्धन येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. ‘आधुनिक भारत’ या महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेत आपले विचार मांडले आहेत.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला वाव देणे आणि त्यांच्यातील विचारांना व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘आधुनिक भारत’ या विषयाच्या विविध पैलूंवर आणि देशाच्या प्रगतीवर प्रभावीपणे भाष्य केलं आहे.
देशाच्या प्रगतीवर प्रभावीपणे भाष्य केलं आहे
स्पर्धकांपैकी आपल्या उत्कृष्ट वकृत्वशैलीनं स्वरा कांबळे,गार्गी पेंढारी,अनामिका भुवड या विद्यार्थीनींनी यश संपादन केलं आहे.यात स्वरा कांबळे हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, गार्गी पेंढारी हीने द्वितीय क्रमांक तर,अनामिका भुवडने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
परीक्षकांचे मार्गदर्शन व आभार प्रदर्शन
या स्पर्धेचे परीक्षण महाड येथील शिवव्याख्याती कु. पूर्वा आनंद सुर्वे तसेच अॅड. पूजा सहदेव दुर्गावले यांनी केले. दोन्ही परीक्षकांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे बारकावे आणि प्रभावी संवाद कौशल्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘दि प्राइड इंडिया’चे मॅनेजर वसंत मोरे, को-ऑर्डिनेटर किरण जाधव आणि डॉ. किशोर शिताळे यांच्यासह संपूर्ण ‘दि प्राइड इंडिया’ व ‘महानगर गॅस’च्या टीमने मोलाचे परिश्रम घेतले. उपस्थितांनी व परीक्षकांनी आयोजकांचे तसेच कॉलेज प्रशासनाचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.








