“उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.राज ठाकरेंचा हा सल्ला ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

“उपोषण हा मार्ग नाही”, राज ठाकरेंचा सल्ला 

आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी MPSC च्या अध्यक्षांना पदावरून हटवण्याची आहे.यावेळी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, १९५० च्या नियमांनुसार MPSC अध्यक्षांना हटवणे थेट राज्य सरकारच्या हातात नसतं. यासाठी राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागतं. राज ठाकरे म्हणाले की, “उपोषण हा मार्ग नाही; आपण प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी काम करूया,” अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

“आपला फोकस हलू देऊ नका”

तसंच ते राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना विश्वासही दिला की ते केवळ भाषणबाजी करण्यासाठी आलेले नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या संतापात सहभागी होण्यासाठी आले आहेत.ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील तरुण मुला-मुलींना त्यांच्या हक्काचा रोजगार आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणाचेही पाय धरण्यास तयार आहे.आपला फोकस आणि लढा कायम ठेवा. हा राग क्षणिक असू देऊ नका , जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपला फोकस आणि लढा कायम ठेवा”

View this post on Instagram

A post shared by MNS Adhikrut (@mns_adhikrut)

राज ठाकरेंचे विद्यार्थ्यांना शिवतीर्थावर आमंञण

एवढंच नाही तर या प्रश्नावर पुढील चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी चर्चेसाठी आमंत्रितही केलं आहे.राज ठाकरे यांनी ९ किंवा १० ऑक्टोबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधींना मुंबईत पुढील चर्चेसाठी बोलावले आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमुळे आणि आश्वासनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. पण उपोषण करून हा प्रश्न सुटणार नसल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे की, ते स्वतः या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून योग्य कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतील. राज ठाकरे यांच्या या भेटीमुळे आणि आश्वासनामुळे आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलनाबाबत बरेच सल्लेही दिले. सोबतच मी इथे भाषण करायला…

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धाक फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच नाही तर चक्क अभिनेत्यांनाही आहे. हे दिसून आलं एका शोमधून. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ‘द ग्रेट इंडियन…

    Leave a Reply

    You Missed

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल