मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

तुम्ही प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहताय आणि तेवढ्यात रेल्वेच्या स्पीकरवर गाडीच्या अनाउंसमेंट ऐवजी चक्क मोठ्या आवाजात छटपूजेची गाणी वाजू लागली तर? होय, हेच घडलंय मुंबईत.प्रवाशांच्या सुविधेसाठी असलेली रेल्वेची अनाऊन्समेंट सिस्टीम बंद करून छटपूजेची गाणी कोणाच्या आदेशाने लावली जात आहेत? महाराष्ट्राला आता यूपी-बिहार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा संतप्त सवाल आता मराठी माणूस विचारतोय.

गिरगाव चौपाटीवर छटपूजेचा कार्यक्रम करण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार  

दिवाळीनंतर आता देशभरात छटपूजा साजरी होणार आहे. मुंबईतही जागोजागी छटपूजा केली जाते. परंतु गिरगाव चौपाटीवर छटपूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर गिरगाव चौपाटीऐवजी अन्य पर्यायी छटरपूजा आयोजित करण्यास जागा उपलब्ध करून देण्याबाबतही कोर्टाने आदेश देण्यास नकार दिलाय. कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर आता मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारावर काही संघटनांनी आक्षेप घेतला. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, नेरूळ यासह अनेक रेल्वे स्थानकांवर आज उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी

मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, नेरूळ यासह अनेक रेल्वे स्थानकांवर आज उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने फेसबुक पोस्ट करत आक्षेप घेतला. याबाबत स्टेशन व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात आली असता, आम्हाला छटपूजेपर्यंत दररोज अशी गाणी लावण्याच्या सूचना वरून असल्याचे उत्तर देण्यात आलं. रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उ‌द्घोषणा या गाड्यांचे आगमन-प्रस्थान, वेळापत्रक, फलाटातील बदल तसेच आपत्कालीन सूचना देण्यासाठी असतात. मात्र, बुधवारी वडाळा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठीच्या नियमित उद्घोषणा बंद करून त्याऐवजी चक्क मोठ्या आवाजात छटपूजेची गाणी वाजवण्यात आली. यावर फेसबुकवरही काही प्रवाशांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत. नेरूळ स्टेशनवरही असाच प्रकार घडला.

महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का? 

मुंबईत भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. मराठी सणाच्या दिवशी भोजपुरी गाणी वाजवल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या सणाला मराठी गाणी सोडून भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का? असं म्हणत मराठी माणसांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बदलापुरातही उल्हास नदीवर छटपूजा करण्यास विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष मनसेच्या भूमिकेकडे लागलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड केल्याची आणि विरोध केल्याने तिला लोकल दरम्यान थेट रेल्वे रुळांवर ढकलून दिल्याची अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.…

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    रत्नागिरी शहरातील जैन नगर परिसरात असलेल्या महालक्ष्मी मिनी मॉलला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले असून, दुकानातील सर्व साहित्य जळून…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    सतेज पाटलांना दणका! ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील, १५ दिवसांनंतर फुटली कोंडी

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल